'फोटोत एकनाथ कुठे आहे...?, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न'

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
CM Eknath Shinde Delhi Metting Photo
CM Eknath Shinde Delhi Metting PhotoSaam TV
Published On

मुंबई : 'दिल्ली भेटीतील ‘नीती’ आयोगाच्या बैठकीवेळचा फोटो माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे...?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे'. असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला. (Ajit Pawar Latest News)

CM Eknath Shinde Delhi Metting Photo
मुंबईत भाजप-शिवसेना संघर्ष पेटणार ? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आखली नवी रणनिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली ८ ऑगस्टला NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) उपस्थित होते.

बैठकीदरम्यानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसले. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून, अजित पवारांनी सरकारचे कान टोचले. (Ajit Pawar Todays News)

CM Eknath Shinde Delhi Metting Photo
सत्ता आली म्हणजे मस्ती आली का? अजितदादांनी शिंदे गटातील आमदारांना फटकारलं

'मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केलं म्हणून सन्मान ढासळावा एवढा महाराष्ट्र निश्चितंच लेचापेचा नाही, परंतु आमचे मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यानंतर महाराष्ट्राचा सन्मान राखू शकले नाहीत, याचे दु:ख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीचा अभिमानास्पद इतिहास रचलेल्या महाराष्ट्राला हे दु:ख अधिक बोचणारं आहे. यापुढे तरी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपण घ्यावी'. असंही अजित पवार म्हणालेत.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं राज्य सरकार लोकशाही व संसदीय परंपरांच्या चिंधड्या उडवून विश्वासघाताच्या पायावर स्थापन झालेले आहे, हे सरकार अद्याप विधीमान्य नाही. सरकारकडून विकासकांना स्थगिती देऊन राज्याच्या विकासाला खीळ घालण्याचं काम सुरु आहे'. असा आरोपही अजित पवार यांनी केला.

'महाराष्ट्राच्या अभिमानाला धक्का लावण्याचं काम आपल्याकडून सातत्यानं घडत आहे. स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्या स्मारक विकासाच्या कामाला आपण स्थगिती दिली'. असंही अजित पवार म्हणालेत. विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची घोषणा घाईघाईनं करुन जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रयत्न केल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com