SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

SRH vs PBKS,Playing XI: आज होणाऱ्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात पंजाबचा संघ सनरायझर्स हैदराबाद संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.
SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११
SRH vs PBKS playing 11 sunrisers hyderabad vs punjab kings playing XI Prediction amd2000Saam tv

आयपीएल २०२४ स्पर्धेतील टॉप ४ मध्ये जाणारे ४ संघ ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफ गाठलं आहे. तर आज होणाऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना जिंकून सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

हा दोन्ही संघांचा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. स्पर्धेतील काही सामने झाल्यानंतर शिखर धवन दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्याच्याऐवजी सॅम करनकडे संघाची जबाबदारी सोपवली गेली. मात्र तो टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशी परतला आहे. त्याच्याऐवजी जितेश शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे ही जितेश शर्मासाठी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असणार आहे.

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११
RCB vs CSK, IPL 2024: फाफ डू प्लेसिस आऊट होता की नॉट आऊट? नेमकं काय घडलं?- Video

तर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १३ पैकी ७ सामने जिंकत हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. आज पंजाबविरुद्ध होणारा सामना जिंकून हैदराबादला गुणतालिकेत दुसऱ्य स्थानी जाण्याची संधी असणार आहे. जर हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला, तर हैदराबादचा संघ अहमदाबादमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध क्लालिफायर १ चा सामना खेळताना दिसून येईल.

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११
RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

या सामन्यासाठी अशी असू शतके दोन्ही संघांची प्लेइंग ११

सनरायजर्स हैदराबादः ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, हेनरिच क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, संवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, मयंक मारकंडे।

पंजाब किंग्ज: प्रभसिमरन सिंग, अर्थव तायडे, राइली रूसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार,यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, राहुल चाहर, नाथन एलिस, अर्शदीप सिंग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com