Devendra Fadnavis Birthday Saam Tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis Birthday: दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला फडणवीसांचा वाढदिवस, व्हिडिओ कॉल करून साधला संवाद

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला.

Saam TV News

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. पेणमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी आग्रह केला असता, त्याला तत्काळ प्रतिसाद देत देवेंद्र फडणवीस यांनी त्याला लगेच प्रतिसाद दिला.

सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे दिव्यांग मुलांची शाळा आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा केला. देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिव्यांगाच्या बाबतीत सहकार्याची भूमिका घेतात. आमच्या संस्थेला सुद्धा त्यांनी मोठी मदत केली, असे सांगत या मुलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याचा आग्रह धरला. त्यांच्या विनंतीला फडणवीस यांनी मान देत त्यांच्याशी संवाद साधला, त्यांचे आभार मानले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांना देशभरातील नेत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री अमित शाह, उपराष्ट्रपती जयदीप धनगड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, हरदीपसिंग पुरी, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, अभिनेते प्रसाद ओक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, नारायण राणे यांच्यासह अनेक नेत्यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंग चौहान, रामदास आठवले, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, अर्जून राम मेघवाल, प्रतापराव जाधव, डॉ. जितेंद्र सिंग, जी. किशन रेड्डी, किरण रिजिजू, अन्नपुर्णा देवी, ज्युएल ओराम, प्रल्हाद जोशी, डॉ. वीरेंद्र कुमार, सर्वानंद सोनोवाल, जितनराम मांझी, धर्मेंद्र प्रधान, पियुष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री तसेच योगी आदित्यनाथ, मनोहरलाल खट्टर, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT