Deepali Sayed Latest News, Raj Thackeray Ayodhya Visit News Saam Tv
मुंबई/पुणे

राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासाठी मोदींचा सल्ला घ्यावा: दिपाली सय्यद

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट करुन राज ठाकरेंवर टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. पण या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरेंनी अगोदर उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागीतली तरच त्यांना अयोध्येत येऊ देणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा ५ जून चा अयोध्येचा दौरा अडचणीत सापडला आहे. यावर आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विट करुन राज ठाकरेंवर (Raj Thackeray) टीका केली आहे. (Raj Thackeray Ayodhya Visit News)

'मोदींना खूष करीण्याकरीता जिवाच रान करणाऱ्या राजसाहेबांनी आयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही, असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी या अगोदरही राज ठाकरेंवर टीका केली होती. आता अयोध्या दौऱ्यावरुन सय्यद यांनी टीका केली आहे. अयोध्येच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला राज ठाकरेंनी घ्यावा असं यात म्हटले आहे.

'राज ठाकरे चूहा है!'; अयोध्या दौऱ्याआधी भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी (Ayodhya visit) मनसैनिकांकडून जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशात मात्र राज ठाकरे यांना रोखण्याचा प्लान आखला जात आहे. उत्तरप्रदेशातील कैसरगंजचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh BJP) यांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय राज यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा बृजभूषण सिंह यांनी दिला आहे. माझा विरोध मराठ्यांना नाही तर, राज ठाकरेंना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मी आदर्श मानतो असंही ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. तसेच त्यांचा अपमानही केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत प्रवेश करावा,” अशी बृजभूषण सिंह यांची मागणी आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा अयोध्येत येण्यापासून रोखण्यासाठी बृजभूषण यांनी नंदिनी नगर येथे संत-महंतांची बैठक बोलावली. या बैठकीला बुधवारी (10 मे) 11 वाजता सुरूवात होणार आहे. बैठकीपूर्वी बृजभूषण सिंह यांनी नवाबगंज ते नंदिनीनगर अशी ५ किमीची रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शनही केलं. या रॅलीत मोठा जनसमुदाय जमला होता.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT