Actress in Dubai: २०२३ मध्ये 'कसौटी जिंदगी के २' मधील अभिनेत्री एरिका फर्नांडिस भारत सोडून दुबईला गेली. सध्या दुबईतील परिस्थिती बिघडली आहे. एरिकाने चाहत्यांसोबत तिची स्थिती शेअर केली आणि ती दुबईमध्ये असल्याचे सांगितले. तसेच तिने सोशल मीडियावर सध्या दुबईत काय सुरु आहे याची माहिती चाहत्यांना दिली.
एरिकाने दुबईतील परिस्थिती स्पष्ट केली
इराण-इस्रायल संघर्षात दुबईला टार्गेट केले जात आहे. दुबईचे हवाई वाहातूक तात्पुरते बंद करण्यात आले आहे. उड्डाण रद्द झाल्यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. ईशा गुप्ता, सोनल चौहान आणि अजित कुमार देखील दुबईमध्ये आहेत. दरम्यान, चाहते एरिकाबद्दल चिंतेत आहेत. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना माहिती दिली की ती दुबईमध्ये सुरक्षित आहे.
हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्री म्हणाली, "यूएई सरकारने हे संकट उत्तम प्रकारे हाताळले आहे. पण, युद्धकाळातील परिस्थितीत जगणे सोपे नाही. हे आवाज खरचं खूप भयानक आहेत. माझ्या आजूबाजूचे लोक, मित्र आणि कुटुंब हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत. हा एक भयानक अनुभव आहे.
एरिकाने लोकांना शांतता राखण्याचा सल्ला दिला ती म्हणते, "आम्ही शांततेत काम करत आहोत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करून आम्ही सुरक्षित आहोत. या युद्धात ज्यांनी प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुखात मी सहभागी आहे.
कामाच्या बाबतीत, एरिका दुबईमध्ये राहून भारतीय ओटीटी शोमध्ये काम करते. तिचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. ती शेवटची २०२४ च्या "लव्ह अधुरा" सिरीजमध्ये दिसली होती. एरिका कसौटी जिंदगी के रीबूट, कुछ रंग प्यार के ऐसे भीसाठी फेमस जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.