Pune Sassoon Hospital News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: ससूनच्या डीनला रुग्णालयातील वार्डची संख्याच माहित नाही, दादा गायकवाडांचं मोठं वक्तव्य

Pune Sassoon Hospital News: गेल्या आठ दिवसापासून ससून हॉस्पिटल बाहेर बेवारस पेशंटचा हिशोब मिळावा यासाठी दादा गायकवाड यांचा आमरण उपोषण सुरू आहे. आज आठव्या दिवशी उपोषण सोडवण्यासाठी ससूनचे डीन एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव गेटवर आले होते.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

गेल्या आठ दिवसापासून ससून हॉस्पिटल बाहेर बेवारस पेशंटचा हिशोब मिळावा यासाठी दादा गायकवाड यांचा आमरण उपोषण सुरू आहे. आज आठव्या दिवशी उपोषण सोडवण्यासाठी ससूनचे डीन एकनाथ पवार व अधीक्षक यलप्पा जाधव गेटवर आले होते. यावेळी उपोषणकर्त्यांशी डीन एकनाथ पवार यांनी संवाद साधला.

यावेळी तुम्ही उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती एकनाथ पवार यांनी गायकवाड यांना केली. त्यावेळी दादा गायकवाड यांनी त्यांना ससून रुग्णालयात किती वॉर्ड किती आहेत? एवढेच मला सांगा, असा प्रश्न केला.

यावेळी एकनाथ पवारांना उत्तर देता आलं नाही. जर तुम्ही ससूनचे डीन आहात तर तुम्हाला वॉर्ड किती आहेत, हे माहिती नाही, मग तुम्ही इतर लोकांवर ती कारवाई कशी करणार? असाही प्रश्न उपस्थित केला.

तुम्हाला रुग्ण किती गायब आहेत, किती अॅडमिट आहेत, हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे मला न्याय कसा मिळेल, माझी मागणी एकनाथ पवार आणि यलप्पा जाधव यांच्यावर कारवाईची आहे. मी दिलेल्या मागण्या तुम्ही लेखी पात्रामध्ये दिलेल्या नाहीत. तुम्ही यल्लाप्पा जाधव यांना पाठीशी घालत आहात. एक मोठा रॅकेट ससूनमध्ये सुरू असल्याचा आरोप दादा गायकवाड यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanda Papad Chutney: ५ मिनिटांत घरच्या घरी तयार करा पापडाची चटपटीत चटणी, कुरेकुरे-चिप्सला विसराल

Brain health tips: विसर पडणं आणि लक्ष न लागणं वाढलंय? मेंदूचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी करा हे उपाय

राज्यात शेतकरी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू; काय आहेत योजनेचे नियम-अटी?

लग्नाच्या रात्री नवरदेवासह ५ मित्र खोलीत गेले; नवरीला दारु पाजली, ओलांडल्या सर्व मर्यादा; नेमकं काय घडलं?

Crime: दीड वर्षे महिलेवर बलात्कार, ३ वेळा गर्भपात; प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाचं भयंकर कांड, पोलिसही चक्रावले

SCROLL FOR NEXT