kishori pednekar  saam tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar Latest News: बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरण, अटकपूर्व जामीनासाठी किशोरी पेडणेकरांची हायकोर्टात धाव

Kishori Pednekar Moves To Mumbai High Court: या घोटाळा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणात (Corruption of buying a dead body bag) मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Ex Mayor Kishori Pednekar) यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यांनी जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. या घोटाळा प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थक गुन्हे शाखेकडून सुरु आहे.

मुंबईत कोरोना काळामध्ये (Corona News) डेड बॉडी बॅग खरेदीचा भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने २९ ऑगस्टला त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आज किशोरी पेडणेकरांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या अर्जावर न्या. नितीन जामदार यांच्या न्यायलायत सोमवारी 4 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत मृत कोरोना रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं होतं. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT