BCCI Media Rights : बीसीसीआयचे मीडिया राइट्स अंबानींच्या कंपनीकडे; एका सामन्यासाठी मोजणार ₹ ६७.०८ कोटी

Viacom18 Bags BCCI Media Rights, Jay Shah Tweet : 'व्हायकॉम १८' ने बीसीसीआयचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क खरेदी केले आहेत.
Viacom18 Bags BCCI Media Rights
Viacom18 Bags BCCI Media RightsSAAM TV

Viacom18 Bags BCCI Media Rights :

उद्योगपती मुकेश अंबानींच्या 'व्हायकॉम १८' ने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क (Media Rights) खरेदी केले आहेत. भारतात होणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क ५ वर्षासाठी व्हायकॉम १८ कडे असणार आहेत.

मागील वेळी २०१८ मध्ये डिज्नी स्टारने माध्यम हक्क खरेदी केले होते. त्यासाठी त्यांनी ६१३८ कोटी रुपये (प्रत्येक सामन्यासाठी ६० कोटी रुपये) दिले होते. यावेळी व्हायकॉम १८ पुढील पाच वर्षांसाठी एकूण ५९६६ कोटी रुपये देईल. त्याप्रमाणे एका सामन्यासाठी ६७.०८ कोटी रुपये (एकूण सामने - ८८ ) द्यावे लागणार आहेत.

Viacom18 Bags BCCI Media Rights
Asia Cup 2023, PAK vs NEP Highlights: पाकिस्तानची विजयी सलामी! नेपाळवर मिळवला २३८ धावांनी विजय

बीसीसीआयने माध्यम हक्कांची विक्री ई-लिलाव पद्धतीने केली आहे. माध्यम हक्क खरेदी करण्याच्या शर्यतीत व्हायकॉम १८ सह डिज्नी आणि सोनी देखील होते. व्हायकॉम १८ ने त्यात बाजी मारली.

या पाच वर्षांच्या काळात मायदेशात ८८ सामने होणार आहेत. त्यात २५ कसोटी, २७ वनडे आणि ३६ टी २० आंतरराष्ट्रीय सामने असतील. यात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सामन्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. व्हायकॉम १८ ला महिला संघाच्या सामन्यांचे प्रेक्षपण हक्क मोफत मिळाले आहेत. (Latest sports updates)

Viacom18 Bags BCCI Media Rights
India vs Pakistan : वारे फिरले, भारत-पाकिस्तान सामना होणार रद्द? नेमकं काय आहे कारण?

याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी X सोशल मीडिया हँडलवरून 'व्हायकॉम १८' चे अभिनंदन केले आहे. पुढील पाच वर्षांसाठी टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क मिळवल्याबद्दल व्हायकॉम १८ चे अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले आहे.

मीडिया राइट्स

आयसीसी इव्हेंट (2024-27) - टीव्ही -झी/सोनी

डिजिटल - हॉटस्टार

भारतातील सामने (2023 - 28) - टीव्ही - स्पोर्ट्स १८, डिजिटल - जिओ सिनेमा

आयपीएल (2023-28) - टीव्ही - स्टार स्पोर्ट्स, डिजिटल - जिओ सिनेमा

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com