Swargate St Depot Case Saam Tv News
मुंबई/पुणे

Datta Gade Case: फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातील ५ बस स्थानकावर दत्ता गाडेचा मुक्त वावर, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Swargate St Depot Case: स्वारगेट तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा स्वारगेट बसस्थानकात सर्वाधिक काळ वावरत असल्याचे तपासातून दिसून आले आहे. यावरून त्याने अगोदरही अशाप्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेसंदर्भात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी दत्ता गाडेची कुंडलीच शोधून काढली आहे. दत्ता गाडे याचे मागील दोन वर्षातील तांत्रिक रेकॉर्ड पोलिसांनी काढले आहे. त्यामध्ये दत्ता गाडेयाचा पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनच नाही तर शिरुर, अहिल्यानगर आणि सोलापूर शहरातील बसस्थानक परिसरातही मुक्त वावर असल्याचे दिसून आले आहे.

मात्र स्वारगेट बसस्थानकात तो सर्वाधिक काळ वावरत असल्याचे दिसून आले आहे. यावरून त्याने अगोदरही अशाप्रकारचे गुन्हे केले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गुन्हे शाखने गाडेच्या कृत्याला बळी पडलेल्या पीडित महिलांना तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

पुणे शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन ही नेहमी गर्दीने गजबजलेली बस स्थानके आहेत. दिवस-रात्र येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्याच संधीचा फायदा घेत गाडे गुन्हेगारी कृत्य करत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलिसांनी दत्ता गाडेची कुंडली काढण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या डीएनए अहवाल आणि न्यायवैद्यक पुरावे एकत्रित करून साधारण १५ दिवसांत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात तरुणीसह तिचे कुटुंबीय आणि मित्राचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पीडित तरुणी स्वारगेट परिसरात ज्या वाहनाने आली त्या कॅबचालक आणि संबंधित शिवशाही बसच्या वाहकाचाही जबाब घेण्यात आला आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रिकरण, ससून रुग्णालयाकडून प्राप्त वैद्यकीय चाचणी अहवाल, बसच्या न्यायवैद्यक तपासणीचा अहवाल अशा पुराव्यांचा आरोपपत्रात समावेश असेल. या गुन्ह्याच्या तपासात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी सुटसुटीत आणि न्यायवैद्यक पुराव्यानिशी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, असे गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT