Swargate Bus Depot: धक्कादायक! दत्ता गाडेसंदर्भात मोठी अपडेट; पैशांसाठी ठेवायचा समलैंगिक संबंध

Swargate Bus Depot Case: आरोपी दत्ता गाडेचा प्रेम विवाह झाला होता. त्याला मुलं देखील आहेत. प्रेमविवाह झालेलं असतानाही आरोपी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
Datta gade
pune crimesaam tv
Published On

स्वारगेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचारप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. आपोरी दत्ता गाडेनं याआधी देखील अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केलाय. आता नुकतीच आणखी एक माहिती समोर आलीय. गाडे हा स्त्रीलंपट असून, तो पैसे कमावण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

आरोपी दत्ता गाडेचा प्रेम विवाह झाला होता. त्याला मुलं देखील आहेत. प्रेमविवाह झालेलं असतानाही आरोपी समलैंगिक संबंध ठेवत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

Datta gade
Viral Video: शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा, २ गटात दगडफेक; वाहनांच्या काचाही फोडल्या, VIDEO व्हायरल

आरोपी कोणताही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे पत्नी आणि दत्ता गाडेमध्ये रोज भांडण होत. पैसे कमावण्यासाठी तो गेल्या काही महिन्यांपासून समलैंगिक संबंध ठेवत होता. यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Datta gade
Crime News: वकिलाचं भयानक कृत्य! मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न, भंडारा हादरलं

शिवशाही बस बलात्कार प्रकरणानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. तपास वेगानं सुरू आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्काराच्या घटनेनंतर, संपुर्ण प्रकरणाचा तपास वेगानं करण्यात यावा, अशा सुचना पथकाला दिल्या आहेत. न्यायालयानं नराधम आरोपी दत्ता गाडेला १२ मार्चपर्यंत पोलीस काठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com