Dahi Handi  Saam TV
मुंबई/पुणे

Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर

Priya More

मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या उत्साहत दहीहंडीचा सण (Dahihandi Festival 2024) साजरा करण्यात आला. 'बजरंग बली की जय...गोविंदा रे गोपाळा' म्हणत गोविंदा पथकांनी जल्लोष केला. रात्रीपर्यंत अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. दहीहंडी साजरी करत असताना अनेक ठिकाणी गोविंदा जखमी झाले. थरावर थर रचण्याच्या प्रयत्नांमध्ये मुंबईसह ठाण्यामध्ये ११४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ४ गोविंदा गंभीर जखमी आहेत. तर ७४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर इतर गोविंदांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

मुंबईसह ठाण्यामध्ये मंगळवारी सकाळपासून दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अनेक राजकीय नेत्यांच्या दहीहंडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. १० थरांची सलामी देण्याचा या गोविंदा पथकाने प्रयत्न केला पण तोल गेल्याने गोविंदा खाली पडले. यावर्षी ठाण्याच्या खोपटचा राजा गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे गोविंदाचा उत्साह आणखी वाढत गेला.

गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये अनेक गोविंदा जखमी झाले. काही गोविंदाच्या मानेला, डोक्याला, हाताला, पायाला दुखापत झाली. काहींचा हात तर काहींचा पाय फॅक्चर झाला. या जखमी गोविंदांमध्ये चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. १३ वर्षांची मुलीच्या मांडीचे हाड मोडले तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजावाडी रुग्णालयात ३ लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. दोन लहान मुलांचे हात फॅक्चर झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये दोन गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एका गोविंदाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. नायर रुग्णालय आणि ट्रॉमा रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची देखील प्रकृती गंभीर आहे. ठाण्यामध्ये १४ गोविंदा जखमी झाले. यामधील काही जणांना गंभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली. कळवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर नवी मुंबईमध्ये ७ गोविंदा जखमी झाले. यामधील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या गोविंदांवर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT