Akshay Shinde Mother On Police Saam Tv
मुंबई/पुणे

Akshay Shinde : गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलं, अक्षय शिंदेच्या आईचा गंभीर आरोप

Akshay Shinde Mother On Police: आज पोलीस एन्काऊंटरमध्ये बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. यानंतर आता त्याच्या आईने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Satish Kengar

गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रकरण दाबण्यासाठी अक्षयला मारलं, असा आरोप अक्षय शिंदेची आई आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सोमवारी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

तळोजा कारागृहातून नेत असताना त्याने कारमधील पोलिसाची बंदूक हिसकावून पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी त्याच्यावर गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला आहे, असं सांगण्यात येत आहे. अक्षयच्या एन्काऊंटर बातमी समोर आल्यानंतर त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

अक्षयच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्याच्या आईने एकच टाहो फोडला. त्याच्या आईने माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे की, ''बाहेर कोणीतरी... काहीतरी करून त्याला मारून टाकलं आहे. माझा मुलगा मला विचारत होता, मला कधी सोडणार. मी त्याला म्हटलं होतं, एक महिना थांब, वकीलांशी विचारून तुला सोडवणार.''

'आम्हांला पण मारून टाका'

अक्षयचा मृतदेह कळवा येथील रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. येथेच त्याचे आई-वडील आणि नातेवाईक दाखल झाले. ''आम्हांला आमच्या मुलाला बघुद्या'', अशी विनंती अक्षयच्या आईने पोलिसांना यावेळी केली. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. पोलिसांनी त्यांना सांगितलं की, अक्षयच्या मृतदेहाला जे जे रुग्णालयात घेऊन जाण्यात येणार आहे, तिकडे तुम्ही त्याला बघा. यानंतर नातेवाईकांनी तिथे गोंधळ घातला. यावेळी अक्षयची आई पोलिसांना म्हणाली की, ''आम्हांला तोंड दाखवा, नाहीतर आम्हांला पण मारून टाका.''

'तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही'

याप्रकरणी बोलताना अक्षयची आई म्हणाली आहे की, ''माझ्या मुलाने कोणताही गुन्हा केला नाही. त्याने कधी फटाकडीही वाजवली नाही. त्याला अडकवलं जात आहे. जोपर्यंत माझ्या मुलाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT