Crime News X (Twitter)
मुंबई/पुणे

Crime News : दोन दिवसांपासून बेपत्ता, सगळीकडे शोध-शोध शोधलं; शेवटी घरातच बॅगमध्ये आढळला चिमुकलीचा मृतदेह

Navi Mumbai Crime News : तळोजा येथील देवीचा पाडा गावातील २ वर्षीय चिमुरडी २५ मार्चपासून बेपत्ता होती. या चिमुरडीचा मृतदेह तिच्याच घरातल्या पोटमाळ्यावरच्या एका पेटीत सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, प्रतिनिधी

तळोजा औद्याेगिक वसाहतीच्या लगत असणाऱ्या देवीचा पाडा गावातील माऊली कृपा इमारतीमध्ये राहणारी दोन वर्षीय चिमुकली बेपत्ता झाली होती. मुलीच्या पालकांनी या संदर्भात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रात्री घराच्या पोटमाळ्यावर एका पेटीमध्ये या बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार २५ मार्च रोजी दुपारी हर्षिका शर्मा ही दोन वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. या प्रकरणी तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा संशय व्यक्त करत हर्षिकाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच दरम्यान हर्षिकाचा मृतदेह तिच्या घरात सापडला.

हर्षिकाच्या घरातून रात्रीच्या वेळेस दुर्गंधी यायला लागली. तेव्हा हा घाणेरडा वास कुठून येतोय हे घरच्यांनी शोधायला सुरुवात केली. त्यावेळेस माळ्यावर शोध घेतला असता त्यांना एका पेटीमध्ये हर्षिकाचा मृतदेह आढळला. तिचे कुटुंब देवीचा पाडा गावातील माऊली कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत आहे.

हर्षिका शर्माच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेह तिच्याच घरातल्या एका पेटीत मिळाल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली आहे. 'लहान मुलीचा अपघाती मृत्यू झाला की तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह पेटीत कुणी ठेवला' याचा तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

Dapoli : कड्यावर वसलेलं गणपतीचं सुंदर मंदिर, दृश्य पाहून व्हाल मंत्रमुग्ध!

SCROLL FOR NEXT