Women Injured After Coyote Attack: Saam Tv
मुंबई/पुणे

Virar Crime News: पुण्यानंतर मुंबईत कोयत्याची दहशत, महिलेने तरुणीवर केला जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Women Injured After Coyote Attack: या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले आहे.

Priya More

चेतन इंगळे, विरार

Virar News: पुण्यामध्ये (Pune) गेल्या काही दिवसांपासून कोयता हल्ल्याच्या (Coyote Attack) घटना वाढल्या होत्या. या घटना ताज्या असताना आता मुंबईमध्ये सुद्धा कोयत्याची दहशत पाहायला मिळत आहे. मुंबईनजीकच्या विरारमध्ये कोयता हल्ल्याची (Virar Coyote Attack) घटना समोर आली आहे. एका महिलेने झेरॉक्सच्या दुकानामध्ये घुसून तरुणीवर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी हल्लेखोर महिलेला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे विरारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये एका महिलेने तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. विरार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ जवळील एका झेरॉक्सच्या दुकानात ही घटना घडली. जुन्या भांडणाचा राग मनामध्ये ठेवून महिलेने तरुणीवर कोयता हल्ला केला. ही धक्कादायक घटना दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला झेरॉक्सच्या दुकानामध्ये आली आहे. या महिलेच्या हातामध्ये एक पिशवी दिसत आहे. तर दुकानामध्ये उपस्थित असलेली तरुणी काही तरी काम करत असल्याचे दिसत आहे. आपल्यासोबत आणलेला कोयता पिशवीमधून बाहेर काढत ही महिला तरुणीवर हल्ला करते. या हल्ल्यामध्ये पीडित तरुणीच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

या हल्ल्यामध्ये प्रचिती पाटील नावाची तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी तरुणीवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी विरोर पोलिसांनी कोयता हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. या घटनेमुळे विरारमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Dussehra: दसर्‍याला आपट्याचीच पाने ‘सोने’ म्हणून का लुटतात? एकमेकांना का वाटतात सोनं?

Onion Juice: जाड अन् घनदाट केस हवीयेत? लावा कांद्याचा रस, काही दिवसातच दिसेल फरक

EMI चा हप्ता थकवलात तर फोन होणार लॉक? आरबीआय नवा नियम आणणार, VIDEO

Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT