Pune News: महावितरणाच्या हलगर्जीपणाने घेतला बळी! उघड्या डीपीचा विजेचा धक्का लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांमध्ये संताप

Pune Vadgaon Sheri News: या घटनेने महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे.
Pune Vadgaon Sheri News
Pune Vadgaon Sheri NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune News: पुण्यातील वडगाव शेरी परिसरातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. महावितरणाच्या उघड्या डीपीच्या विजेचा धक्का लागून गंभीररित्या भाजलेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे.

Pune Vadgaon Sheri News
Kalyan News : आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली; प्रमोद हिंदुराव यांचा जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्ष टोला

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अंकुश खंडू बनसोडे असे या 13 वर्षीय मुलाचे नाव असून ही घटना एप्रिल महिन्यात घडली होती. वडगाव शेरी भागात आनंद पार्क बस स्टॉपलगत महावितरणचा डीपी उघड्यावर आहे. अंकुश त्या ठिकाणी गेला असता रोहित्रातील विजेचा धक्का लागून तो गंभीर भाजला होता.

त्यावेळी बसस्थानकावर उभे असलेले नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते ससून येथील उपचारानंतर अंकुशला घरी सोडण्यात आले होते. तसेच त्याच्यावर कार्यकर्त्यांच्या आर्थिक सहाय्यातून घरूनच उपचार सुरू होते. (Pune Crime News)

Pune Vadgaon Sheri News
Maharashtra Politics: 'कलंकित सरकारच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकणार..' अधिवेशनाआधीच 'महाविकास आघाडी' आक्रमक

या दुर्घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा वाढदिवस देखील साजरी केला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती पुन्हा खालावली. उपचारासाठी पुन्हा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचे रविवारी पहाटे दुर्दैवी निधन झाले आहे. या प्रकरणी नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com