Maharashtra Politics: उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेतेच सत्तेत सहभागी झाल्याने यंदाचे पावसाळी अधिवेशन विरोधकांच्या आक्रमतेशिवाय होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Political News)
काय म्हणाले अंबादास दानवे..
"सध्या सत्तेत असलेले हे कलंकित सरकार घटनाबाह्य सरकार आहे. त्यांच्याकडून चहापानाचे निमंत्रण दिले होते. मात्र यावर विरोधी नेते बहिष्कार टाकणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच कांद्याला अनुदान मिळाली नाही, शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही," त्यामुळे शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
तसेच "सगळ्यात जास्त आत्महत्या या सरकारच्या काळात झाल्या असून हे सरकारचे अपयश असल्याचे सांगत, अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी अनेक प्रश्न तयार" असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
राष्ट्रवादीत नेमकं चाललयं काय?
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर विरोधात गेलेले राष्ट्रवादीचे मंत्री आज शरद पवारांच्या भेटीला आले. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र अधिवेशनाच्या आधी शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया प्रफूल पटेल यांनी दिली आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.