Ulhasnagar News : टोईंग केलेली गाडी मिळवण्यास जाणाऱ्या मोटरसायकल मालकाचा अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

टोईंग केलेली गाडी मिळवण्यास जाणाऱ्या मोटरसायकल मालकाचा अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam tv
Published On

उल्हासनगर : उल्हासनगर वाहतूक विभागातील गाड्या टोईंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घाईगडबडीत (Ulhasnagar) आणि नियम डावलून काम करण्याच्या पद्धतीत आज एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे. (Maharashtra News)

Ulhasnagar News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गलगतची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ गुन्ह्यांची चोरट्याकडून उकल

उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील १७ सेक्शन भागात रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी कोणतीही अनाउन्समेंट न करता टोईंग गाडीवरील कर्मचारी घाईगडबडीत उचलत होते. दुचाकी उचलली म्हणून ती गाडी पुन्हा मिळवण्यास जाणाऱ्या मोटरसायकल मालकाचा अपघात झाला. या अपघातात त्याचे डोके फुटलं आणि तो गंभीर जखमी झाला. या घटनेत वाहतूक पोलिसांची चूक असल्याने नागरिकांनी वाहतूक पोलिसांना घेरून आपला रोष व्यक्त केला. सध्या जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे.

Ulhasnagar News
Jalgaon News : घरात घुसून अतिप्रसंगाचा प्रयत्न, लहान बहिणीच्‍या आरडाओरडने वाचली; संशयिताला चोप देत नागरीकांनी पेटविली दुचाकी

गुन्‍हा दाखल करायची मागणी

दरम्यान वाहतूक विभागाच्या चुकीमुळे अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. गाडी टोईंग करणारे कर्मचारी गाडी उचलण्याच्या नादात दादागिरी करतात. त्याला (Traffic Police) वाहतूक पोलीस सहकार्य करतात असा नागरिक आरोप करत आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा; अशी मागणी होत आहे व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com