Jalgaon News : घरात घुसून अतिप्रसंगाचा प्रयत्न, लहान बहिणीच्‍या आरडाओरडने वाचली; संशयिताला चोप देत नागरीकांनी पेटविली दुचाकी

घरात घुसून अतिप्रसंगाचा प्रयत्न, लहान बहिणीच्‍या आरडाओरडने वाचली; संशयिताला चोप देत नागरीकांनी पेटविली दुचाकी
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन आदिवासी मुलीवर अतिप्रसंग होत असतानाच तिच्या लहान बहिणीने आरडाओरड करून वाचविल्याची घटना (Jalgaon) शुक्रवारी घडली. यावेळी संतप्त जमावाने त्या भामट्याची दुचाकी पेटवून देत त्याच पेटत्या दुचाकीवर टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी (Police) तत्काळ त्याला ताब्यात घेत अटक केली. भारत सुभाष सूर्यवंशी (वय ३४, रा. चंदुअण्णानगर) यास आज जिल्‍हा न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (Tajya Batmya)

Jalgaon News
Dhule News : गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीतून न्यावे लागले खांद्यावर; खराब रस्त्‍यामुळे रूग्णवाहिका येईना

जळगावातील कोल्हे हिल्स परिसरात पत्र्याच्या घरात मोलमजुरी करणारे आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहे. शुक्रवारी (१४ जुलै) सोळावर्षीय चिमुरडी लहान बहिणीसह एकटीच घरात होती. आई- वडील व दोन्ही भाऊ कामावर गेले होते. दरम्‍यान दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदूअण्णानगरात राहणारा भारत सूर्यवंशी (वय ३४) हा त्याच्या दुचाकीने घराजवळ आला. पिण्यासाठी पाणी मागून तो (Crime News) घरात शिरला. काही वेळातच त्याने पीडितेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला.

Jalgaon News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गलगतची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नऊ गुन्ह्यांची चोरट्याकडून उकल

पेटत्या दुचाकीवर टाकण्याचा प्रयत्न

पीडिताच्‍या लहान बहिणीने आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. संशयिताला चोप देत त्याची दुचाकी पेटवून दिल्यावर त्या पेटत्या दुचाकीवर त्याला टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयिताला जमावाच्या तावडीतून सुटका करून अटक केली. तालुका पोलिसांत पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊन संशयिताला जिल्‍हा न्यायालयात हजर केले असात न्यायालयाने संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com