ED News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai ED Raid : कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आजही धाडसत्र सुरुच, BMCच्या आणखी एका अधिकाऱ्याच्या घरी छापा

Mumbai News : मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ED चे छापेमारी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai News : मुंबईत काल म्हणजे 21 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने जवळपास 15 ठिकाणी धाडी टाकल्या. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती. काल सुरु झालेलं हे धाडसत्र आजही सुरु आहे.

आज मुंबई महापालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरी ED ने छापेमारी केली आहे. बिरादार हे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. या धाडसत्रावरुन अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील सत्तासंघर्षात अधिकाऱ्यांना नाहक त्रास नको, अशी चर्चा अधिकारी वर्गात सुरु आहे.

ईडीने काल मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरावर छापेमारी केली. तसेच आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या घर आणि ऑफिसमध्येही ईडीने धाड टाकली होती. (Latest Marathi News)

किरीट सोमय्या यांचा निशाणा

या प्रकरणात सर्वात आधी तक्रार देणार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या कंपनीला 100 कोटींचे कोविड कॉन्ट्रॅक्ट मिळाले कसे? जी कंपनी अस्तित्वात नाही त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं.  (Marathi Tajya Batmya)

पुणे महापालिकेने या कंपनींना ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या वरळीच्या एनएससीआय कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट पण सुजित पाटकरला दिले गेले. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना कमाईचा हिशोब द्यावाच लागेल, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

SCROLL FOR NEXT