Court News Saam Digital
मुंबई/पुणे

Court News : लिंबूसाठी मध्यरात्री महिलेच्या घराचं दार ठोठावणं योग्य आहे का? कोर्ट काय म्हणालं?

Mumbai Court News : मध्यरात्री महिलेचे दार ठोठावणाऱ्या सीआयएसएफच्या जवानाला ठोठावलेला दंड रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दारू पिऊन मध्यरात्री महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावणे हे गैरवर्तन असल्याचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सांगितले.

Sandeep Gawade

Court News

मध्यरात्री महिलेचे दार ठोठावणाऱ्या सीआयएसएफच्या जवानाला ठोठावलेला दंड रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दारू पिऊन मध्यरात्री महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावणे हे गैरवर्तन असल्याचे न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने सांगितले.

सीआयएसएफचा जवान अरविंद कुमार हा मुंबईत बीपीसीएल येथे कर्तव्यावर होता. १९ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्री त्याने शेजारी राहणाऱ्या महिलेचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी महिलेचा पती पश्‍चिम बंगाल येथे ड्युटीवर गेला होता. तसेच, महिला सहा वर्षाच्या मुलासह घरात एकटीच होती. जवानाने गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्याचे तीन वर्षांचे वेतन कमी करण्यात आले होते. तसेच त्याला वेतनवाढही नाकारण्यात आली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या विरोधात अरविंद कुमार याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यादिवशी आपले पोट बिघडल्यामुळे केवळ लिंबू मागण्यासाठी आपण दरवाजा ठोठावला होता, असा युक्तिवाद त्याच्याकडून करण्यात आला होता. तर आरोपीने आपल्याला धमकावले असल्याचा आरोप महिलेने केला होता.

दरम्यान, न्यायमुर्ती नितीन जामदार आणि एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्त्याने घटनेपुर्वी मद्यप्राशन केले होते. त्या वेळी तक्रारदार महिलेचा पती घरी उपस्थित नव्हता याचीही त्याला जाणीव होती. अशातच पोट दुखत आहे म्हणून लिंबू मागायला जाणे हा निंदनीय प्रकार आहे. सीआयएसएफसारख्या दलाच्या अधिकाऱ्याचे असे वर्तन नक्कीच अशोभनीय आहे, असे स्पष्ट करत खंडपीठाने कुमारची याचिका फेटाळून लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Vivah 2025: तुळशी विवाहाच्या दिवशी करा 'हे' हळदीचे खास उपाय

IndW vs SAW Final : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वर्ल्डकप फायनल लाइव्ह कुठे बघाल फ्री? वाचा

Gauri Kulkarni: गोऱ्या गोऱ्या रंगाची 'ही' अभिनेत्री कोण?

Maharashtra Live News Update : मनमाड परिसरात जोरदार पावसाची हजेरी

Thane To Amravati: ठाणेहून अमरावतीला कसे पोहोचाल? 'या' मार्गांचा वापर करून करा आरामदायी प्रवास

SCROLL FOR NEXT