Lok Sabha Election: पीयुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून तिकीट; कोटक, शेट्टी यांना डच्चू , कार्यकर्ते आक्रमक

Bjp Lok Sabha Candidate List : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. या यादीत मुंबई उत्तरमध्ये करण्यात आलेला बदल अनेकांना आश्चर्यचकित करणारा आहे. १० वर्ष खासदारकी केलेल्या उमेदवाराला भाजपने डच्चू दिलाय.
Bjp Lok Sabha Candidate List
Bjp Lok Sabha Candidate ListHub News
Published On

(संजय गडदे, मुंबई)

Bjp Lok Sabha Candidate List Mumbai :

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या रिंगणात महाराष्ट्रातून कोणत्या उमेदवारांना उतरवलं जाणार यावरील पदडा उठलाय. भाजपने लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. या यादीत महाराष्ट्रातील नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रतीम मुंडेसह गोपल शेट्टी, मनोज कोटक यांचं तिकीट कापण्यात आलं आहे.(Latest News)

लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले असून सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू झाली आहे.यात भाजपाने आघाडी घेत १९३ उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. अशातच मुंबईत महायुतीकडून मात्र मुंबईच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होतं. भाजपाकडून मुंबईतील तीन खासदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी देणार अशी चर्चा होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही चर्चा खरी ठरत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान फक्त तिकीट कापलं जाणार असल्याची असताना गोपळशेट्टी यांच्या समर्थक नाराज झाले. आज कांदिवली पश्चिमेकडील गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयाबाहेर जमा होऊन जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान तिकीट न देण्याविषयी मुंबईमध्ये गोपाल शेट्टी आणि मनोज कोटक यांना दिल्ली हायकमांडकडून फोन आला होता.

खासदार गोपाळ शेट्टी नगरसेवकातून आमदार आणि नंतर खासदार झाले. १० वर्षे खासदार असल्याने ते जनतेत लोकप्रिय आहेत. ज्यांना दोन वेळा संसदरत्न देण्यात आले आहे. उत्तर मुंबईत गार्डन किंग म्हणून ओळखले जायचे. दरम्यान भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नागूपरमध्ये नितीन गडकरी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना करनाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्ली तर योगेंद्र चंदोलिया यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट मिळालं आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत १० राज्यातील ७२ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com