मुंबई विद्यापीठात पहिल्यांदा या शैक्षणिक वर्षापासून मंदिर व्यवस्थापना संबंधित अभ्यासक्रम सुरु केला जात आहे. मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम हा मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केद्रांच्या पुढाकारामुळे पूर्णत्वास आला आहे. या मंदिर व्यवस्थापन विषयात ६ महिन्यांते प्रमाणपत्र आणि १२ महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम राबविला जाणार आहे.
अभ्यासक्रमाची निर्मिती
मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया येत्या जून २०२४ पासून सुरु होत आहे. नुकतेच मुंबई विद्यापीठाचे (University)हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारातून सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी यासर्व दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
मंदिर (Temple)व्यवस्थापन अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान- परंपरा, , व्यवस्थापन शास्त्राची महत्वाची सूत्रे व तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी मुद्यावर प्रकाश टाकला जाणार असून त्यात महसूल आणि वित्त व्यवहार, माहिती तसेच तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण आणि परिसरपूरक अशा अनुषंगिक विषंयावर या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे.
3 महिन्यांचे प्रशिक्षण
मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमात 3 महिन्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल.
नवीन रोजगाराच्या संधी
विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमांमुळे भारतीय ज्ञान परंपरेची ओळख होईल त्याचबरोबर एका नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच या अभ्यासक्रमाच्या प्रतिसादावर याची व्याप्ती वाढवून 'एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट' असाही अभ्यासक्रम राबविण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षित तरूणांना रोजगार
देशातल्या अनेक मंदिरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून सौर ऊर्जा निर्मिती, दानवस्तूंचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी आणि रांगांचे व्यवस्थापन अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रातही रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असून प्रशिक्षित तरूणांना रोजगार मिळू शकेल असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.