कोरोनानंतर मुंबईत मलेरियाचा विळखा Saam Tv
मुंबई/पुणे

कोरोनानंतर मुंबईत मलेरियाचा विळखा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट कायम असतांनाच आता मलेरियाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता वाढवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोनाच्या Corona तिसऱ्या लाटेचे सावट कायम असतांनाच आता मलेरियाच्या Malaria वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता वाढवली आहे. मुंबईत Mumbai मागील १५ दिवसामध्ये मलेरियाच्या तब्बल ३९५ रुग्णांची भर पडली आहे. यावरून दिवसाला सुमारे २६ लोकांना मलेरिया होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचे संकट आणखी संपले नाही. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची देखील शक्यता यावेळी वर्तवली जात आहे. यातच आता मुंबईला मलेरिया ने चांगलाच विळखा घातला आहे. ऑगस्ट महिन्याच्या १५ दिवसात मुंबईमध्ये ३९५ मलेरियाचे रुग्ण आढळले आहे. मुंबई मध्ये आता मलेरिया डोके वर काढत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे.

हे देखील पहा-

जुलै मध्ये मलेरिया बाधित रुग्णांची संख्या ७८७ इतकी होती, तर मागील ७ महिन्यात २९४३ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.ऑगस्ट २०१९ मध्ये मलेरियाचे ८२४ तर ऑगस्ट २०२० मध्ये ११६५ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी मलेरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतांना, मलेरियाच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ चिंताजनक वाटत आहे.

कोरोना आणि मलेरियाची लक्षणे सारखेच दिसत असल्यामुळे लोकांनी आजाराकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने यावेळी केले आहे. पावसाबरोबरच पावसाळी साथीचे आजार डोके वर काढत असतात. यावर्षीच्या अनियमित पावसामुळे मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत मलेरिया आजाराची परिस्थिती नियंत्रणात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT