
नाशिक: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील (Corona Second Wave) रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतांनाचं आता नाशकात डेंग्यू आणि चिकन गुनियाचं थैमान पाहायला मिळत आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यातचं डेंग्यूचे शंभरहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत, तर चिकनगुनियचेही 78 रूग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पावणे चारशेवर गेली आहे, तर चिकन गुनियाच्या रुग्णांची संख्या तीनशेच्या वर पोहचलीय.
त्यामुळे आरोग्य यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे. दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकन गुनियाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकेकडून धूर आणि औषध फवारणी केली जाते, जनजागृती करण्यात येते. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजनांनंतरही रुग्णसंख्या वाढत असल्यानं पालिकेच्या धूर आणि औषध फवारणीबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
शहरातील वेगवेगळ्या भागात नव्यानं डेंग्यू आणि चिकन गुनियाचे रूग्ण आढळून येत असतांनाही आरोग्य विभाग सुस्तच असून नोंदणी न झालेल्या आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक लॅबकडून डेंग्यू आणि चिकन गुनियाच्या रुग्णांचे रिपोर्ट पालिकेकडे कळवण्यात यावेत, यासाठी पालिका आयुक्तांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.