Chandrashekhar Bawankule Vs Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Vs Bawankule: ...तर कोर्टात जाऊ, 'खुशाल जा', बावनकुळे आणि राऊतांमध्ये चांगलीच जुंपली...

Latest Political News in Marathi: ...तर कोर्टात जाऊ, 'खुशाल जा', बावनकुळे आणि राऊतांमध्ये चांगलीच जुंपली...

साम टिव्ही ब्युरो

Chandrashekhar Bawankule Vs Sanjay Raut: ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होईतो की, ''सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे यांचं डोकं काम नाही करत आहे. आमचे मुंबईचे नेते आणि कार्यकर्ते सामना वृत्तपत्र विरुद्ध आंदोलनात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. सामनाविरुद्ध आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत.''

'वाचाल तर वाचाल', राऊतांच्या पलटवार

बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ''मी वाट पाहत आहे, ते कधी कोर्टात जातायत. त्यांनी जायला हवं. त्यांच्याकडे चांगला वकील नसेल तर मी त्यांना चांगला वकील देतो. भाजपने तो अग्रलेख काळजीपूर्व वाचायला हवा. वाचाल तर वाचाल.'' (Latest Marathi News)

फडणवीस यांच्यावर सामना अग्रलेखातून काय करण्यात आली टीका?

आजच्या सामना अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत लिहिण्यात आलं आहे की, ''देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे.''  (Latest Marathi News)

यात पुढे लिहिण्यात आलं आहे की, ''अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

Parenting Tips: मुलांना आपले मित्र बनवायचंय? तर फॉलो करा 'या' टिप्स

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT