Sharad Pawar News: 'ईडीची कारवाई बघून काही जण भाजपसोबत', शरद पवार यांचा रोख कोणाकडे?

Sharad Pawar Latest Speech: 'ईडीची कारवाई बघून काही जण भाजपसोबत', शरद पवार यांचा रोख कोणाकडे?
Sharad Pawar Latest Speech
Sharad Pawar Latest SpeechSaam Tv
Published On

Sharad Pawar Latest Speech: ''गेल्या काळात काही बदल झाले. आपल्या सहकाऱ्यांनी पक्षांतर केलं. ते म्हणतात विकासासाठी गेलो. त्यात काही तथ्य नाही. जे गेले त्यांचावर केंद्र सरकारकडून ईडी चौकशी सुरू आहे. काही चौकशीला सामोरे जायला तयार होते. काही नव्हते. अनिल देशमुख १४ महिने तुरुंगात होते. त्यांना सांगितल होत तुम्ही बदल करा. ते नाही म्हणाले तुरुंगात राहिले.'', अजित पवार गटावर हल्लाबोल करत असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी सोशल मीडिया मीट अप या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

पवार म्हणाले, ''पक्षांतर केलं की राज्यकर्त्यांचा बाजूला जाऊन बसावं लागत. त्यांना इतकचं सांगितल की, तुम्ही आसामच्या बाजूने बोला. तुमच्या केसचं आम्ही काही करणार नाही.''

Sharad Pawar Latest Speech
CWC List: 2024 साठी काँग्रेसची फौज तयार, CWC मध्ये सचिन पायलटची आणि शशी थरूर यांची एन्ट्री

सोशल मीडिया कडे दुर्लक्ष करू शकत नाही: शरद पवार

या कार्क्रमात बोलताना शरद पवार म्हणाले आहेत की, सोशल मीडिया कडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपले काय सुरू आहे, विरोधकांचे काय सुरू आहे, यासाठी सोशल मीडियावर लक्ष देणे गरजेचे आहे. (Latest Marathi News)

'राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करत आहेत'

भाजपला लक्ष्य करत पवार म्हणाले की, ''देशाचे महत्वाचे नेते सत्तेचा गैरवापर करत आहेत. त्यांनी कार्यालयात २०० टीव्ही बसवले आहेत. न्युज सेक्शनवर लक्ष ठेवले जाते. काही टिप्पणी केली की, त्यासंबंधित संदेश दिला जातो. तो संदेश आला की, शासनाच्या महत्वाच्या व्यक्तींकडून त्या चॅनलला फोन जातो की, ही बातमी दिली गेली आहे. ती पुन्हा लावली तर परिणाम भोगावे लागतील.''

Sharad Pawar Latest Speech
CWC List: काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी अखेर जाहीर; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह हंडोरे यांचीही वर्णी

'हे घडत आहे पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात'

शरद पवार म्हणाले, ''वाराणसीमध्ये एक गांधीवादी संस्था होती. त्या संस्थेने 1960 साली जमीन घेतली. त्याचा सह्या विनोबा भावे जयप्रकाश नारायण आणि लाल बहादूर शास्त्री यांनी जमीन घेतली. इथे काम सुरू होते. तिथे शेकडो पुस्तक होती, ती उघड्यावर फेकून दिली. पंतप्रधान जिथून निवडून येतात त्या वाराणसी मध्ये हे घडले.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com