Congress Working Committee List: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) नव्या टीमची घोषणा केली आहे. खरगे यांनी आपल्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांचाही आपल्या नवीन टीममध्ये समावेश केला आहे. याशिवाय गांधी घराण्यातील तीनही चेहरे काँग्रेस कार्यकारिणीत ठेवण्यात आले आहेत.
या नवीन टीममध्ये खरगे यांच्यानंतर सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे नाव आहे. तसेच राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी, एके अँटनी, अंबिका सोनी, मीरा कुमार आणि दिग्विजय सिंह यांच्या नावाचाही समावेश आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नव्या टीमची घोषणा अनेक अर्थांनी काँग्रेससाठी महत्त्वाची ठरू शकते.
जी-23 नेत्यांचाही समावेश होता
एकेकाळी काँग्रेसवर नाराज असलेल्या नेत्यांनाही काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे. या नेत्यांनी जी-23 गट तयार केला होता. या नेत्यांमध्ये आनंद शर्मा आणि शशी थरूर यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश होता, जे आता सीडब्लूसीचा भाग बनले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसमधील ही सर्वात मोठी निर्णय घेणारी समिती आहे. (Latest Marathi News)
समितीची घोषणेपुर्वी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. य समितीत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचाही समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या चारही फॉरवर्ड संघटनांचे प्रमुख - युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस आणि सेवा दल - सीडब्लूसीचे पदसिद्ध सदस्य असतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर पदभार स्वीकारला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.