Sunetra Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Baramati : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा, काँग्रेसनं बारामतीमधून अधिकृत उमेदवारी मागे घेतली

Baramati bypoll : बारामती पोटनिवडणुकीतू काँग्रेसने माघार घेतल्याची अधिकृत घोषणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. पत्रकार परिषदेत त्यांनी आकाश मोरे माघार घेणार असल्याचे सांगितले.

Namdeo Kumbhar

Congress withdraws Baramati bypoll candidate Akash More : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिकृत याबाबत घोषणा केली. सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेऊन अर्ज माघारी घेण्याबाबत विनंती केली होती. सुनेत्रा पवार यांनी ५ एप्रिल आणि आजही याबाबत फोन केला होता. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, मकरंद पाटील यांच्याकडूनही अर्ज माघारीची विनंती केली होती. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे आज उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली.

भाजपसारख्या विखारी पक्षासोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राहू नये, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार यांच्या घातपाताचा तपास केला जात नाही, हे महाराष्ट्रासाठी अतिशय वाईट आहे, असे सपकाळ म्हणाले. आज सभ्यतेमुळे माघार घेत आहोत. पण २०२९ मध्ये बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार असेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत बारामती पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस माघार घेत असल्याचे सांगितले. यावेळी सपकाळ यांनी भाजपवर टीकेची झोड उडवली. त्याशिवाय अजित पवार यांच्या विमान अपघाताचा गुन्हा महाराष्ट्रात दाखल होत नाही, हे दुर्दैव असल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या शब्दाचा मान ठेवत आपण माघार घेतली आहे. आम्ही या पोट निवडणुकीतून माघार घेत आहे, आम्ही या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देत नसल्याचेही सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

अजित पवारांच्या अपघाताबाबत एफआयआर नोंदवा ही काँग्रेसची भूमिका योग्य असल्याचेही यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. सुप्रिया सुळे, शरद पवारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या नंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती, सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

भाजपशी विरोध आमचा कायम स्वरुपाचा आहे. अजित पवार गटानेही भाजपच्या विखारी विचारांच्या पक्षासोबत राहू नये ही भूमिकाही आमची कायम आहे. अजित पवार यांच्यासारख्या नेत्याच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने केला जात नाही. गुन्हे दाखल केले जात नाही. कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करावा लागला. या एफआयआरबाबत आम्ही पाठपुरावा करत राहू, असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अतिक्रण कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल

Maharashtra Politics: भाजपमध्ये प्रवेश करणार का? अजित पवारांच्या बड्या नेत्याने एका वाक्यात विषय संपवला

लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार; ३५व्या हप्त्याची तारीख आली समोर

Train Timetable: ट्रेन प्लॅटफॉर्मवर कधी आणि किती वेळ थांबते? हे कोण ठरवतं?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! महागाई भत्ता वाढणार नाही? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT