डेव्हिड मिलरला अश्रू अनावर! दिल्लीला शेवटच्या २ चेंडूंत २ धावा हव्या होत्या; पण गुजरातने जबड्यातून विजय हिसकावला, व्हिडिओ व्हायरल

David Miller crying video : DC vs GT सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा एका धावेने पराभव केला. शेवटच्या दोन चेंडूंवर विजय हातातून गेल्यानंतर डेव्हिड मिलरला अश्रू अनावर झाले. पाहा संपूर्ण हायलाइट्स आणि व्हिडिओ.
David Miller crying video
David Miller crying video
Published On

Delhi Capitals vs Gujarat Titans Match Highlights : अरुण जेटली स्टेडियमवर श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा अवघ्या १ धावेने पराभव केला. हा पराभव डेव्हिड मिलर आणि दिल्लीच्या जिव्हारी लागला. गुजरातविरोधात एका धावेनं पराभव झाल्यानंतर विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलरला आपले अश्रू आवरता आले नाहीत. विजयाच्या अगदी जवळ पोहचल्यानंतर फक्त एका चूकीने दिल्लीचा पराभव झाला. यामुळे निराश झालेल्या मिलर मैदानातच ढसाढसा रडला. कर्णधार अक्षर पटेल याने त्याला सावरले. मिलरला अश्रू अनावर झालेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१० धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिलच्या ७०, जोस बटलरच्या ५२ आणि वॉशिंग्टन सुंदरच्या ५५ धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २१० धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात के.एल. राहुलच्या ९२ धावांच्या झुंजार खेळीमुळे दिल्ली विजयाच्या उंबरठ्यावर होती. शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज असताना डेव्हिड मिलरने चौथ्या चेंडूवर षटकार खेचत सामन्याचे पारडे दिल्लीच्या बाजूने झुकवले होते. पण शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना मिलरला एकही धाव काढता आली नाही. पाचव्या चेंडूवर मिलरने धाव घेण्यास नकार दिला आणि शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला. अवघ्या एका धावेच्या फरकाने सामना गमावल्यामुळे वॉर्नरला मानसिक धक्का बसला आणि तो भर मैदानात रडू लागला.

शेवटच्या दोन चेंडूंवर प्रसिद्ध कृष्णाने दाखवलेला संयम गुजरातसाठी टर्निंग पॉईंट ठरला. दिल्लीच्या बाजूने के.एल. राहुल आणि पथुम निसांका यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याचा फटका संघाला बसला. मिलरची ४१ धावांची खेळी दिल्लीला 'हिरो' बनवू शकली नाही. १९ व्या षटकात डेव्हिड मिलर हिरो झाला होता, पण शेवटच्या २ चेंडूमुळ तो व्हिलन ठरला. या निसटत्या पराभवामुळे दिल्लीच्या गोटात निराशेचे वातावरण पसरले. तर मिलरला अश्रू रोखता आले नाहीत.

David Miller crying video
DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला होता. कर्णधार शुभमन गिलने ४५ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली, तर जोस बटलर (५२) आणि वॉशिंग्टन सुंदर (५५) यांनी अर्धशतके झळकावून संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. दिल्लीच्या वतीने विप्रज निगमने १ बळी घेतला. विजयासाठी २११ धावांचे मोठे लक्ष गाठताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. के.एल. राहुलने ५२ चेंडूत ९२ धावांची झंझावाती खेळी केली. तर सलामीवीर पथुम निसांकाने ४१ धावांचे योगदान दिले. सामना शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक वळणावर पोहोचला होता. डेव्हिड मिलरने २० चेंडूत ४१ धावा कुटून दिल्लीच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी फक्त २ धावांची गरज असताना गुजरातचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने कमाल केली. त्याने सलग दोन चेंडू निर्धाव टाकले आणि अंतिम चेंडूवर कुलदीप यादव धावबाद झाला. यामुळे दिल्लीला ८ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना अवघ्या १ धावेने हा सामना गमवावा लागला.

David Miller crying video
खरातनंतर आणखी भयंकर नाशिक फाइल्स पार्ट - 2 ; पुणे कनेक्शन उघड, महिला कर्मचाऱ्यांना परदेशात विकायचा होता प्लान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com