congress and shivsena  saam tv
मुंबई/पुणे

काँग्रेस धावली शिवसेनेच्या मदतीला; अंधेरी पोटनिवडणुकीबाबत नाना पटोलेंनी भूमिका केली स्पष्ट

अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Nana Patole News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाचं चिन्ह गोठविल्यानंतर अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेला निवडणुकीत नवे चिन्ह आणि पक्षासाठी नवे नाव वापरावे लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीत नवे चिन्ह घेऊन लढावे लागणार आहे. याच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नाना पटोले म्हणाले, 'महाविकास आघाडीतील ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ असं आमचं ठरलं होतं. त्याप्रमाणे आम्ही पोटनिवडणुकीला पाठिंबा देत आहे. सोनिया गांधी यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला'.

'काँग्रेस पक्ष अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. ही जागा काँग्रेसची आहे. पण सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतला आहे. काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रचार करणार आणि सेनेला मदत करू. ५०-६० हजार मतांनी शिवसेनेला विजयी करू, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

'अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे मदत करू. आजे जे काही प्रश्न आहेत हे महत्वाचे आहेत. एक अत्याचारी केंद्र सरकारच्या रुपात आलेलं आहे, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचं चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पटोले म्हणाले, केंद्रात असलेलं भाजप सरकारचा केंद्रीय निवडणूक आयोगावर दबाव आहे'. तर भारत जोडो यात्रेवर पटोले म्हणाले, 'अनेक राजकीय पक्षाची लोक भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Local Body Election : नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मोठी घोषणा; या शहरातील कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

Wedding Saree Collection: सासरी उठून दिसाल! नव्या नवरीने या 5 प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करा

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

SCROLL FOR NEXT