Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Former Home Minister Anil Deshmukh
Former Home Minister Anil Deshmukh Saam TV
Published On

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. देशमुख यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाने परवानगी देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या देशमुखांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाण्याची परवानगी मागितली होती. (Bombay Sessions Court)

त्यांची ही मागणी आता मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली असून जसलोक रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहेत. तर जसलोक रुग्णालयामध्ये अॅजिओग्राफी करण्यात येणार असल्याचीही माहीती समोर येत आहे.

Former Home Minister Anil Deshmukh
Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावाणी पुढे ढकलली

न्यायालयाकडून देशमुखांना आज दुसरा दिलासा दिला आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला होता. परंतु सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नसल्यामुळे ते तुरुंगामध्येच आहेत. अशातच आता न्यायालयाकडून उपचारासाठी परवानगी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com