Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावाणी पुढे ढकलली

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.
Sanjay Raut ED Custody
Sanjay Raut ED CustodySaam TV
Published On

Sanjay Raut News: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊतांना आज न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. मुंबई सत्र न्यायालयात राऊतांच्या जामीन अर्जावर आज सुनावाणी झाली.

न्यायालयाने वेळे अभावी आजच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब करून पुढील आता ती १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवली आहे. त्यामुळे राऊतांचा मुक्काम आता १७ ऑक्टोंबरपर्यंत कोठडीतच असणार आहे.

मागील सुनावणीवेळी ईडीकडून राऊतांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे वेळ मागीतला होता. त्यानुसार राऊतांची कोठडी १० ऑक्टोंबर म्हणजे आजपर्य़ंत वाढली होती. त्यानुसार आज राऊतांना पुन्हा मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं होतं. मात्र आज वेळे अभावी ही सुनावणी पुर्ण झाली नाहीये.

दरम्यान आजच्या सुनावणी मध्ये ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार ४ प्रकारात जामीन अर्जाची विभागणी करण्यात आली होती. ईडीच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण गैरव्यवहारात संजय राऊत यांचा पडद्यामागून हात आहे. म्हाडा आणि इतर प्रशासकिय बैठकांसाठी संजय राऊत यांनी त्यांच्या राजकीय हेतूने मदत केल्याचेही तपासात समोर आलं.

गुरू आशिष कंपनीत प्रवीण राऊत यांच्यासोबतचे त्याचे आर्थिक व्यवहार तर प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधव राऊत यांच्या बँक खात्यातूनही वर्षा राऊत यांना पैसे पाठवण्यात आले असल्याचे तपासात समोर आलं असून दोघांमध्ये झालेल्या व्यवहारातील १ कोटी ६ लाख या पैशांचा हिशोब लागत नाही अशी माहिती ईडीकडून कोर्टात देण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com