Shivsena : मशाल चिन्हावर ३३ वर्षांपूर्वी शिवसेनेचा खासदार निवडून आला होता, काय आहे इतिहास? जाणून घ्या

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे १९८९ मध्ये याच मशाला चिन्हावर निवडून आले होते.
Shivsena
Shivsena Saam Tv
Published On

मुंबई : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) पक्षचिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाला कोणतं पक्षचिन्ह मिळणार याची उत्सुकता सर्वांना आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने चिन्हासाठी तीन पर्याय दिले आहेत. त्यामध्ये मशाल चिन्हाचा समावेश आहे.

शिवसेनेचा आणि मशाल चिन्हाचा इतिहास माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं आहे. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पहिले खासदार मोरेश्वर सावे १९८९ मध्ये याच मशाला चिन्हावर निवडून आले होते. १९८९ चा काळ आणि आताची स्थिती पाहिल्यास चिन्ह गोठवले तरी त्याचा प्रचार करणे, लोकांपर्यंत पोहोचवणे पहिल्यापेक्षा सोपे असल्यानं शिवसेनेला कोणतीही अडचण येणार नसल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

Shivsena
Sanjay Raut: संजय राऊतांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावाणी पुढे ढकलली

१९८८ च्या काळात शिवसेनेने बाणाच्या चिन्हावर महापालिका निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे मोरेश्वर सावे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली. तत्पूर्वी समर्थनगर वॉर्डातून १९८८ मध्ये मशाल चिन्हावरच अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. नंतर शिवसेनेला पाठिंबा दिला.

१९८९ मध्ये मशाल चिन्हावरच निवडणूक लढवत सावे औरंगाबादचे पहिले खासदार झाले होते. सोशल मीडियामुळे लोकांना सर्व माहिती होत आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने संयमाने पक्ष हाताळला त्यामुळे लोक शिवसेनेच्या पाठीशी राहतील, असंही खैरे यांनी सांगितलं.

Shivsena
Eknath Shinde: शिंदे गटाने आयोगाला दिली ३ नावे; तिन्ही नावांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख

एकनाथ शिंदेंनी पुन्हा कुरघोडी केली- खैरे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा कुरघोडी करत निवडणूक आयोगाकडे पसंतीची ३ चिन्हे पाठवली आहेत. त्यात त्रिशुल, उगवता सूर्य आणि गदा यांचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंनीही त्रिशुल, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे ठाकरे गटाने मागितलेल्या चिन्हांवरच शिंदे गटाने दावा करत निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका केलीय. खैरे म्हणाले, नेहमीच कुरघोडी करत राहणारा शिंदे गट कायम शिवसेनेला त्रास देण्याच काम करत आहे. शिवसेना, शिवसैनिक संपली पाहिजे असा त्यांचा मानस दिसतोय. या सर्व कुरघोडींना आम्ही घाबरत नाही, घाबणार नाही असेही त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com