Congress Saam tv
मुंबई/पुणे

Mahanagarpalika Elections Result Live: ना ठाकरे, ना भाजप...मुंबईत काँग्रेसनंच उघडलं पहिलं विजयाचं खातं, शेवाळेंना दणका

BMC municipal corporation election result live : मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान काँग्रेसने पहिला विजय मिळवत खाते उघडले आहे. भाजप आणि ठाकरे शिवसेनेत जोरदार लढत सुरू असतानाच काँग्रेसने बाजी मारली आहे.

Namdeo Kumbhar

ठाकरेंच्या मुंबईमध्ये पहिला विजय काँग्रेसने मिळवलाय. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर दोन तासांच्या आत काँग्रेसच्या उमदेवाराने विजयी पतका फडकावली. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा असतानाच काँग्रेसने मजबूत पकड मिळवली आहे. मुंबईमध्ये काँग्रेसचे १५ पेक्षा जास्त उमेदवार उघाडीवर आहेत. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजप आणि ठाकरेंमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. ही लढत सुरू असतानाच काँग्रेसने मुंबईत पहिलं विजयाचे खाते उघडलेय.

मुंबईत काँग्रेसने खाते उघडले -

मायानगरी मुंबईमध्ये कुणाची सत्ता येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप, ठाकरेंमध्ये जोरदार लढत सुरू आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने पहिला विजय मिळवला आहे. प्रभाग - १८३ मध्ये काँग्रेसच्या आशा दीपक काळे यांनी विजय मिळवला आहे. मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा त्यांनी दारूण पराभव केला.

काँग्रेसने मुंबईत पहिला विजय मिळवत बाजी मारली आहे. मुंबईमध्ये पहिला कौल काँग्रेसच्या पारड्यात गेला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून आशा काळे यांनी १४५० मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी मनसेच्या पारुबाई कटके आणि शिवसेनेच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या राजश्री खाडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.

शिवसेना खासदारांना धक्का -

शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक १८३ मधून आशा काळे आणि वैशाली शेवाळे यांच्यामध्ये काटे कीं टक्कर झाली. यामध्ये काँग्रेसच्या आशा काळे यांनी १४५० मतांनी विजय मिळवला. वैशाली शेवाळे या खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिणी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

SCROLL FOR NEXT