दाजी असावा तर असा...दाजीनं मेहण्यांच्या लग्नात माहौलच करुन टाकला... बायकूचा भाव म्हणल्यावर विषय जरा काळजाच्या जवळाचा... मेहुण्याचं लग्न म्हणल्यावर काय तरी हाटके करण्याचा प्लान दाजीनं आखला... बर एक नाय दोन मेहुण्यांचे लग्न एकाच दिवशी... मग दाजीनं दोन्ही मेहुण्यांना सरप्राईज देवूनच टाकलं... कसं तर अस्स...
मेहुणं चाललं वरातीत घोड्यावर बसालया... दाजीचं झाली एन्ट्री अन् थेट दोन्ही मेहुण्यांना म्हणाला चला माडीवर... मेहुण्यांना माडीवर केलं उभं.. अन् गळ्यात घातला 100 फुटी लांब... 500 रुपयांच्या नोटांचा 1 कोटीचा हार... दोन्ही मेहण्यांना सारखा.. म्हणजी 1-1 कोटीचं दोन हार...उडवलाय का नाय दणकेबाज बार...
हारबी 100 फुटांचा... वजनदार हारामुळं माडीवर उभ्या असलेल्या मेहुण्यांना सावरायला वर चार माणसं अन् खाली हाराचं सुरक्षेसाठी 10 माणसं... दाजी म्हणजी वजनाचा विषय.. मेहण्या लग्न दाजीमुळं एकदम दर्जा झालं...थोडक्यात काय असा दाजी सगळ्यांना मिळो आणि महत्त्वाचं म्हणजी लग्नाळू मेहुण्यांनो ही बातमी एकदा तुमच्या दाजीला पाठवाच...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.