CNG, PNG prices
CNG, PNG prices Saam Tv
मुंबई/पुणे

CNG PNG Price : सीएनजी पीएनजीच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर

साम टिव्ही ब्युरो

CNG PNG Price News : इंधन दरवाढीत होरपळून निघालेल्या वाहनधारकांना दिलासा देणारी बातमी आहे. महानगर गॅस लिमिटडने पीएनजी आणि सीएनजीच्या किंमतीमध्ये घट केली आहे. सीएनजीची किंमत प्रति किलो ६ तर पीएनजीची किंमत प्रति किलो ४ रुपयांनी कमी करण्यात आली आहे. १६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत. (CNG PNG Price Latest News)

त्यामुळे आता सीएनजीसाठी सर्व करांसह सुधारित दर प्रति किलो ८० रुपये तर पीएनजीसाठी प्रतिकलो ४८ रुपये ५० पैसे असा असणार आहे. विशेष बाब म्हणजे एप्रिल महिन्यापासून ऑगस्टपर्यंत सीएनजी दरात सातत्याने वाढ झाली होती. या कालावधीत सीएनजीच्या दरात तब्बल सहा वेळा वाढ करण्यात आली होती.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, शहर गॅस वितरकाने सीएनजीसाठी प्रति किलोग्रॅम ६ रुपये आणि पाइप्ड नैसर्गिक वायूसाठी प्रति युनिट ५ रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती. एप्रिल महिन्यापासूनची ही सहावी दरवाढ होती. उद्यापासून घरगुती आणि सीएनजीचा दर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, नवीन दरांनुसार मुंबईत सीएनजी ८० रुपये तर घरोघरी स्वयंपाकासाठी वापरला जाणारा पीएनजी ४८.५० रुपये प्रति किलो उपलब्ध होईल. हे दर १७ ऑगस्टपासून लागू होतील. सध्याचे हे दर पेट्रोलच्या तुलनेत ४८टक्के स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तर, पीएनजी हा एलपीजीच्या तुलनेत १८ टक्के स्वस्त असल्याचा दावा देखील कंपनीनं केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : Raigad Voting : धाटाव येथे मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड; ४५ मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण

Datta Bharane Video : ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? इंदापुरात दत्ता भरणे यांची मतदारांना दमदाटी; व्हिडिओ व्हायरल

Baramati Lok Sabha: मतदानादरम्यान सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, कुटुंबीयांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या?

Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

SCROLL FOR NEXT