Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात आज मतदान होत आहे. यामध्ये बारामती, माढा, रायगडसह ११ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
Maharashtra Lok Sabha election phase 3 voting live
Maharashtra Lok Sabha election phase 3 voting liveSaam TV

मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून तुम्ही लढलात युती म्हणून मतं मागितली. बाळासाहेब एकीकडे मोदींकडे आणि हे सगळं चित्र तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलात आणि मत मागितली. मला सांगा सरकार कोणाबरोबर व्हायला पाहिजे होतं 2019 मध्ये शिवसेना भाजपाचे सरकार व्हायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या मोहापाई मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांची भूमिका सोडली या महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान जनतेला विश्वासघात तुम्ही केला.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

मुंबईतील मोदींची सभा आणि रोड शोच नियोजन केलं जाणार

एमसीए क्लब येथे उद्या संध्याकाळी 9 वाजता होणार बैठक

आशिष शेलार , प्रवीण दरेकर , प्रसाद लाड

उदय सामंत, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अन्य नेते असणार उपस्थित

Loksabha Election Update: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

निवडणूक रोखे, इन्कम टैक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे व आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत घेण्यासाठी देखील पैशाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Loksabha Election Update: धाराशिवमध्ये ५५.४६ टक्के मतदान : कांही केंद्रांवर सांयकाळी सात नंतरही मतदान सुरू

धाराशिव लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५५.४६ टक्के इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागातून देण्यात आली आहे. दरम्यान मतदानाची वेळ ६ वाजेपर्यंत असली तरी यानंतर परंडा विधानसभा मतदारसंघातील कांही मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या मतदारांचे मतदान सांयकाळी सात वाजले तरी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही.

Loksabha Election Update: धाराशिव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर अजूनही मतदान सुरूच

धाराशिव जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपूनही अजूनही मतदान सुरूच

मतदान यंत्रे संथ गतीनं चालत असल्याने मतदानाला वेळ

अर्धा ते पाऊण तास मतदान चालण्याची शक्यता

कळंब, भूम,धाराशिव तालुक्यातील मतदान केंद्रांचा समावेश

Loksabha Election Update: सोलापुरात निकालाआधीच काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

सोलापुरात निकालाआधीच काँग्रेसला विजयाचा विश्वास

मतदान प्रक्रिया पूर्ण होताच सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष

रामलाल चौक ते भैय्या चौकापर्यंत घोषणाबाजी करत पदयात्रा

राम सातपुते आणि भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

घटनेची माहिती मिळताच स्वतः पोलीस आयुक्त एम. राजकुमार घटनास्थळी

रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार: नारायण राणेंना विश्वास

मला यशाची खात्री आहे 60 टक्के पेक्षा जास्त मतदान म्हणजे कमळ फुलणार आहे. मला तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल. घटक पक्ष आणि भाजपचे पदाधिकारी यांनी चांगलं काम केलं. या सर्वांची मेहमत ,परिश्रम पाहता महायुतीचा उमेदवार विजयी होईल, असा दावा नारायण राणेंनी केलाय.

हरियाणात भाजपला मोठा धक्का; अपक्ष आमदारांनी समर्थन घेतल मागे

हरियाणात भाजप सरकारला दिलेलं समर्थन अपक्ष आमदारांनी घेतल मागे

३ अपक्ष आमदारांनी समर्थन घेतल मागे

काहीच दिवसांपूर्वी हरियाणात नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल होत

तिन्ही आमदारांनी काँग्रेसला समर्थन दिल्याची माहिती

आमदार सोमबीर सांगवान, आमदार धर्मपाल गोंदर आणि आमदार रणधीर गोलन यांनी घेतल समर्थन मागे

आमदारांनी समर्थन मागे घेतल्याने भाजप सरकार अल्पमतात येणार ?

सोलापुरात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आमने-सामने

सोलापुरात पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आमने-सामने

सोलापुरातल्या श्री सिद्धेश्वर शाळेसमोरील मतदान केंद्रावरचा प्रकार

भाजपचे उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे देखील होते उपस्थित

दोन्ही बाजूंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकमेकांसमोर केली जोरदार घोषणाबाजी

घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस उपायुक्त विजय कबाडे घटनास्थळी दाखल

पोलिसांनी मतदान केंद्रासमोर जमलेली गर्दी पांगवली

अंतिम मतदार यादीतून शेकडो नावे वगळली; विजयकुमार देशमुख यांचा आरोप

प्रारूप मतदार यादी मध्ये नाव असताना अंतिम मतदार यादीतून शेकडो लोकांची नावे वगळली

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप करत व्यक्त केला संताप

प्रशासनाच्या चुकीमुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील हजारो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार असल्याचा ही दावा

शहरातील अनेक मतदारसंघांमध्ये मतदानाला गेलेल्या अनेक मतदारांची नावे यादी मधून डिलीट करण्यात आल्याचे प्रकार समोर येतायत

अशाच एका मतदार केंद्रावर जाऊन आमदार विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या

जिवंत असलेल्या व्यक्तीला मतदार यादी मध्ये मृत दाखविण्यात आले आहे

जिल्हा प्रशासनाच्या चुकीमुळेच मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहावं लागत आहे, या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची विजयकुमार देशमुख यांची माहिती

Loksabha Election Update: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

मुंबई, दि.,७ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर - ५५.३८ टक्के

सांगली - ५२.५६ टक्के

बारामती - ४५.६८ टक्के

हातकणंगले - ६२.१८ टक्के

कोल्हापूर - ६३.७१ टक्के

माढा - ५०.०० टक्के

उस्मानाबाद - ५२.७८ टक्के

रायगड - ५०.३१ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के

सातारा - ५४.११ टक्के

सोलापूर - ४९.१७ टक्के

Loksabha Election Update:  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५२.७८ टक्के मतदान

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५२.७८ टक्के मतदान

लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक ५६.०६ टक्के मतदान तुळजापुर विधानसभा क्षेत्रातून

तर सर्वात कमी ४९.३४ टक्के मतदान हे परंडा विधानसभा क्षेत्रातून

Loksabha Election: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत 53.75 टक्‍के मतदान

कणकवली 55.14 टक्‍के कुडाळ 59.09 टक्‍के सावंतवाडी 60.30 टक्‍के चिपळूण 52.62 टक्‍के रत्‍नागिरी 49.83 टक्‍के राजापूर 47.31 टक्‍के

Loksabha Election: सुनेगाव सांगवी गावात लोकसभा मतदानावर बहिष्कार

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी गावात लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला आहे.. लातूर नांदेड महामार्गावरच्या सुनेगाव फाटा येथे महामार्ग ओलांडण्यासाठी डिव्हायडर आणि प्रवाशी बसला थांबा देण्याची गावकऱ्यांची मागणी आहे.. जवळपास 450 लोकसभेसाठीच मतदान या गावात आहे, मात्र मागण्या मान्य होत नसल्याने गावकऱ्यांचा बहिष्कारा वरील निर्णय सध्या तरी ठाम दिसत आहे.. स्वतः तहसीलदार आणि SDO हे देखील गावात जाऊन गावकऱ्यांना मतदानासाठी प्रवर्त करण्याचा प्रयत्न केला आहे

Loksabha Election: ईव्हीएम हॅक करण्यासाठी अंबादास दानवेंकडे मागितले दीड कोटी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ईव्हीएम हॅक करून लागेल तितकं मतदान करून देतो अशी बतावणी करणाऱ्या एका व्यक्तीला छत्रपती संभाजी नगरच्या गुन्हे शाखेने आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. दीड कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या मारोती ढाकणे याला एक लाख रुपये देऊन सापळा रचला. मारुती ढाकणे हा जम्मू-काश्मीरमध्ये सैन्या मध्ये नोकरीला आहे. मला काही दिवसांपासून सुट्टीवर असताना त्यांनीही फोन करून ईव्हीएम हॅक करतो असा दावा करीत पैशाची मागणी केली

Loksabha Election: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

ईव्हीएम मशीनला पूजा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Loksabha Election: ईव्हीएमवर मतदान करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड, निवडणूक आयोग कारवाई करणार

सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाच्या नियमाचे केले उल्लंघन

मतदान केंद्रात मोबाईल न्यायला परवानगी नसताना सुनेत्रा पवारांच्या समर्थकाने ईव्हीएमवर घड्याळाला मतदान करतानाचा व्हिडिओ केला रेकॉर्ड

निवडणूक आयोगाने याची दखल घेतली असून, कारवाईची प्रक्रिया सुरु

बारामती लोकसभा मतदान केंद्रावरील सुरक्षेचा प्रश्न गंभीर

ज्याने व्हिडीओ काढला त्याचे नाव सागर भुमकर आहे.

खडकवासला मतदारसंघातील आहे.

बारामती मतदारसंघात 150 हून अधिक आचारसंहिता भंगच्या तक्रारी

⁠सुप्रिया सुळे यांच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाकडे १५० हून अधिक तक्रारी

बारामती लोकसभा मतदारसंघात बूथ कॅप्चरींग, पोलिस संरक्षणात पैसे वाटपासह धमक्या व शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओ पुराव्यासह तक्रारी

सुळे यांच्या वकिलांकडून 150 हून अधिक गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत. बूथ कॅप्चरींग, मतदारांना खुलेआम पोलिस संरक्षणात पैसे वाटप करणे. पोलिंग बूथवर दारू पिऊन धमकाविणे, शिवागाळ करणे, मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यास मज्जाव करणे, धक्काबुक्की व मारहाण केल्याच्या गंभीर तक्रारी अधिकृत ई मेलद्वारे करण्यात आल्या आहेत.

भोर तालुक्यातील बुरुडमाळमध्ये झालं शंभर टक्के मतदान

पुणे जिल्ह्यातील सर्वात लहान मतदान केंद्र असलेल्या भोर तालुक्यातील बुरुडमाळ येथे झाले शंभर टक्के मतदान

गेल्या 75 वर्षात पहिल्यांदा या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र स्थापन केले आहे.

या मतदार केंद्रावर एकूण 41 मतदान असून एक नाव दुबार आहे.

झालेल्या 40 मतदानात 20 पुरुष व 20 महिलांनी बजवला मतदानाचा हक्क

यापुर्वी त्यांना 7 किमी अंतर असलेल्या सांगवी वेखो पायपीट करत जाऊन करावे लागत‌ होते मतदान

गावातच मतदान‌ करायला मिळाल्याने प्रशासनाचे आभार मानत‌ गावकर्यांनी केले समाधान‌ व्यक्त

सांगोल्यात जाळण्यात आलेल्या मशीनच्या जागी नवीन ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बसवलं

सांगोल्यातील जाळण्यात आलेल्या मशीनच्या बदल्यात नवीन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन बसविण्यात आले.

संबंधित मतदान केंद्रावर शांतता असून सुरळीत मतदान सुरू आहे.

जे मशीन जळाले आहेत त्यावरील मतदान मोजता येणार आहे.

त्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान घेण्याची कोणतीही गरज नाही.

सांगोल्यात ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एका युवकाने ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर गोंधळ

मतदार यादीत नाव नसल्याने प्रचंड मतदारांनी घतला गोंधळ

कोरोची येथील कन्या विद्या मंदिर येथे मतदारांनी घातला ठिय्या

निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

पोलीस घटनास्थळी दाखल

आंदोलक मतदारांची समजूत काढण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू

सुरेश उर्फ बाळ्या मामा मात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार १२ मेला कल्याणमध्ये

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाला अवघे 13 दिवस उरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कल्याण लोकसभा ,भिवंडी लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू होणार आहेत .महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी शरद पवार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत येत्या 12 तारखेला हा दौरा होणार असून शहापूर पासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

१२ आणि १७ मे रोजी राज ठाकरे, नरेंद्र मोदी एकाच मंचावर, बाळा नांदगावकर यांची माहिती

दहा मे रोजी मनसे नेते राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग चौक येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. या सभेस महायुतीचे नेते उपस्थित राहतील. ज्या ज्या ठिकाणी सभा आवश्यक आहे त्या जागी सभा होईल. यानंतर राज ठाकरे यांची १२ मे रोजी सभा कल्याण, ठाणे, डोबवली तर १७ मे रोजी मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देखील सभा होणार आहे.

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, पाचव्या आरोपीला ठोकल्या बेड्या

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

गुन्हे शाखेने केलं पाचव्या आरोपीला कोर्टात हजर

आरोपी मोहम्मद चौधरीला करण्यात आलं मोक्का कोर्टात हजर

मोहम्मद चौधरीला राजस्थानवरून करण्यात आली आहे अटक

सलमानच्या घरावर गोळीबार प्रकरणी आरोपींना अर्थसहाय्य करणे तसेच रेकी आणि कट रचल्याचा आहे मोहम्मद चौधरीवर आरोप

Loksabha Election:  धाराशिव मतदारसंघात ४१.२८ टक्के मतदान 

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ - ४१.२८%

उस्मानाबाद विधानसभा - ३७.९७ %

औसा विधानसभा -४३.७० %

तुळजापूर विधानसभा - ४२.३७ %

परंडा विधानसभा - ४१.२८ %

बार्शी विधानसभा -३९.३४ %

बारामतीत शरद पवार गटाकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ३ तक्रारी  दाखल

बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीन तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल

यातील पहिली तक्रार भोर विधानसभा मतदारसंघात पैसे वाटपाचे संदर्भात दाखल करण्यात आली आहे या पैसे वाटपाचे व्हिडिओ सोशल मीडियातून वायरल झाले होते.

⁠तर दुसरी तक्रार इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका कार्यकर्त्याला केलेल्या दमदाटी विरोधात करण्यात आली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या वतीने ऍडव्होकेट प्रांजल अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संबंधित पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे या तक्रारी केलेल्या आहेत या तक्रारी बरोबर पैसे वाटपाचे आणि दत्ता भरणे यांचे व्हिडिओ देखील जोडण्यात आले आहेत

Loksabha Election: महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे चुरशीना मतदान

चंदगड तालुक्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संभाजी राजे यांच्याकडे केली तक्रार

दादागिरी करून मतदान केलं जात असल्याची केली संभाजीराजांकडे कार्यकर्त्यांनी तक्रार

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात इमारतीला आग

ठाण्यातील वर्तक नगर परिसरात एका इमारती मध्ये आग लागली आहे. सदरचा घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी धूर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाहिये.

Loksabha Election: तिसऱ्या टप्प्यात ११  मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.६३ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे.

लातूर - ४४.४८ टक्के

सांगली - ४१.३० टक्के

बारामती - ३४.९६ टक्के

हातकणंगले - ४९.९४ टक्के

कोल्हापूर - ५१.५१ टक्के

माढा - ३९.११ टक्के

उस्मानाबाद - ४०.९२ टक्के

रायगड - ४१.४३ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के

सातारा - ४३.८३ टक्के

सोलापूर - ३९.५४ टक्के

Loksabha Election: धाराशिवमध्ये झालेली हाणामारी वैयक्तिक करणावरून, पोलिसांची माहिती

भुम तालुक्यातील पाठसांगवी येथे दोन गटात झालेली मारहाणीची घटना ही वैयक्तिक कारणावरून झाल्याची पोलिसांनी माहिती

मतदान केंद्राच्या बाहेर गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे व समाधान नानासाहेब पाटील यांच्यात वैयक्तिक कारणावरुन वाद झाल्याची माहिती

दोघांच्या वैयक्तिक वादातुन धारदार हत्याराने करण्यात आला वार

वैयक्तिक वादातुनच गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे यांनी समाधान नानासाहेब पाटील यांच्यावर वार केल्याने झाला मृत्यू

सदरील घटना मतदानाच्या अथवा निवडणूकीच्या संदर्भात घडलेली नसल्याची पोलीसांची माहिती

मतदान केंद्रावर सुरळीत मतदान सुरू;पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहीती

Loksabha Election: सोलापूर जिल्ह्यातील भैरववाडी ग्रामपंचायतीने टाकला मतदानावर बहिष्कार

सोलापूर लोकसभेतील मोहोळ तालुक्यातल्या भैरववाडी ग्रामपंचायतीने घातला बहिष्कार

गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार घालत मतदान केंद्राबाहेर मारला ठिय्या

भैरववाडी गावामध्ये एकूण 428 मतदार असून त्यापैकी केवळ 9 जणांनी केलं मतदान

गावामध्ये रेशन दुकान, आरोग्य केंद्र, एसटी सेवा आणि रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार

Loksabha Election: सांगोल्यात मतदान मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात

सांगोल्यात मशिन पेटवण्याचे प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना

सांगोला तालुक्यातील एका मतदाराने मतदान मशिन पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती

अधिकाऱ्यांनी त्या तरुणाला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले

सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथील घटना

दरम्यान जिल्हा प्रशासन या संदर्भात अधिकची माहिती घेतं असून मतदानावर कोणतेही प्रभाव झाले नसल्याचा दावा

Loksabha Election: रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत ४४.७३ टक्‍के मतदान

चिपळूण ४६.७२ टक्‍के

रत्‍नागिरी ४१.00 टक्‍के

राजापूर ४१.६८ टक्‍के

कणकवली ४६.४० टक्‍के

कुडाळ ४८.४४ टक्‍के

सावंतवाडी ४५.०१ टक्‍के

Loksabha Election:  रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात 1 वाजेपर्यंत 33.91 % मतदान

कुडाळ 32.88 %

कणकवली 31.59 %

सावंतवाडी 36.65 %

LokSabha Election: सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्यातील २ गावांनी टाकला मतदानावर बहिष्कार

मोहोळ तालुक्यातील मनगोळी आणि भैरववाडी ग्रामस्थांनी गावाला येण्यासाठी रस्ते नसल्यामुळे ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलाय.

मानगोळी गावातील 208 मतदारांपैकी फक्त आठ मतदारांनी सकाळपासून केले मतदान

मागील विधानसभेतही रस्त्याच्या मागणीतून मतदानावर बहिष्कार टाकला होता.

Loksabha Election:  तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि.७ में २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१ .५५ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे

लातूर - ३२.७१ टक्के

सांगली - २९.६५ टक्के

बारामती - २७.५५ टक्के

हातकणंगले - ३६.१७ टक्के

कोल्हापूर - ३८.४२ टक्के

माढा - २६.६१ टक्के

उस्मानाबाद - ३०.५४ टक्के

रायगड - ३१.३४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१ टक्के

सातारा - ३२.७८ टक्के

सोलापूर - २९.३२ टक्के

kolhapur Election: कोल्हापूरमध्ये मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या वृध्द मतदाराचा मृत्यू

उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावरील घटना

मतदानासाठी रांगेत उभारलेले महादेव श्रीपती सुतार वय ६ ९ यांचा मृत्यू

महादेव श्रीपती सुतार हे चक्कर येऊन कोसळले

नातेवाईकांसह, कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले

उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

या घटनेमुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली.

Kolhapur Loksabha Election: कोल्हापूर मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 38.42 टक्के मतदान

चंदगड- 271- 37.15 टक्के

कागल- 273- 40.03 टक्के

करवीर -275- 42.12 टक्के

कोल्हापूर उत्तर 276- 37.85 टक्के

कोल्हापूर दक्षिण 274- 35.46 टक्के

राधानगरी- 272- 38.18 टक्के

हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान

हातकणंगले- 278 – 39.65 टक्के

इचलकरंजी 279 – 33.77 टक्के

इस्लामपूर- 283- 37.20 टक्के

शाहूवाडी- 277- 35.48 टक्के

शिराळा- 284- 34.98 टक्के

शिरोळ – 280- 35.71 टक्के

Sangola Election : सांगोल्यात बागलवाडीत EVM मध्ये बिघाड

सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील‌ मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती

मशीनमध्ये बिघाड झाल्याचे वृत्त

नवीन मशीन बसवण्याचे काम सुरू

Raigad Breaking : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा मतदानावर बहिष्कार

रखडलेल्या धरण प्रकल्पामुळे बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

मतदान केंद्रांवर शुकशुकाट

शासनाच्या मनधरणीनंतर देखील बहिष्काराच्या मुद्द्यावर प्रकल्पग्रस्त ठाम

पेण तालुक्यातील जावळी, निफाड, वरसई, करोटी, निधवळी, वाशिवली, जांभूळवाडी, घोटे अशा दहा मतदान केंद्रांवर शुकशुकाट

या मतदान केंद्रांवर झालेल्या मतदानाची आकडेवारी शासनामार्फत अद्याप देण्यात आली नाही

PM Modi in Beed : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी घेणार अंबाजोगाईत सभा, तयारी पूर्ण

बीडच्या अंबाजोगाई शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही सभा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे अनेक नेते सभेला उपस्थित राहतील. अंबाजोगाईच्या कृषी महाविद्यालय परिसरात ही सभा होणार आहे. अंदाजे एक लाख नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलीय.

Shekhar Suman Joins BJP : अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली -

अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

शेखर सुमन यांनी पटना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर लढवली होती निवडणूक

राधिका खेरा यांचाही पक्षप्रवेश

खेरा यांनी २ दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा दिला होता राजीनामा

राजीनामा देताना त्यांनी राम मंदिरात जण्यावरून काँग्रेसवर केले होते गंभीर आरोप

Dattatray Vithoba Bharne  : दत्तात्रेय भरणे अडचणीत, व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रिया सुळेंची EC कडे तक्रार

इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांचा मतदारांना दमदाटी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच व्हिडिओवरून आता भरणे अडचणीत येण्याची शक्यता आहे. बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तत्पूर्वी, भरणे यांनी या व्हायरल व्हिडिओनंतर स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कार्यकर्त्यांमधील वाद सोडवत होतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

Latur Voting News : हायवेवर डिव्हायडर नाही, मतदान नाही; ग्रामस्थांनी टाकला बहिष्कार

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव फाटा येथे महामार्गावर डिव्हायडर नसल्याने ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला. सकाळपासून मतदानप्रक्रिया सुरू झाली असली तरी, गावात आतापर्यंत शून्य टक्के मतदान झाले. त्यामुळे स्वतः तहसीलदार आणि एसडीओ ग्रामस्थांची समजूत काढत आहेत. मतदान करावे असे आवाहन करत आहेत.

Maharashtra Election Voting Update : महाराष्ट्रात सकाळी ११ पर्यंत किती टक्के मतदान

महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत किती टक्के मतदान? आकडेवारी पाहा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघांत सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले.

लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी

लातूर - २०.७४ टक्के

सांगली - १६.६१ टक्के

बारामती - १४.६४ टक्के

हातकणंगले - २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

Baramati Voting Update till 11 AM : बारामतीत किती टक्के मतदान झालं? वाचा आकडेवारी

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी - सकाळी 11 वाजेपर्यंत

दौंड : 12 टक्के

इंदापूर : 14.48 टक्के

बारामती : 18.63 टक्के

पुरंदर : 14.08 टक्के

भोर : 13.08 टक्के

खडकवासला : 14 टक्के

Raigad Voting : धाटाव येथे मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड; ४५ मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू

रायगड जिल्ह्यातील धाटाव येथील मतदान केंद्रातील मशिनमध्ये बिघाड झाला होता. मतदारांना काहीकाळ ताटकळत राहावं लागलं. अधिकारी वर्गाची यावेळी तारांबळ उडाली. नवीन मशिन आणून ४५ मिनिटांनी मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली.

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, शिंदे गटाला मोठा धक्का

ऐन लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

Solapur Voting Update : बार्शीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी केलं मतदान

सोलापूर

बार्शी येथे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी बजावला मतदानाचा हक्क

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे.

मतदान हे पवित्र असते, लोकशाहीतील हा क्षण असतो. मतदान सर्वांनीच करावे.

देशाचे जे निर्णय घेतले जातात, ह्याच लोकशाही प्रक्रियेतून. म्हणून मतदान करावे

देशहिताला प्राधान्य द्यावे असे आवाहनही राजेंद्र राऊत यांनी केले आहे.

Ratnagiri - Sindhudurg : रत्नागिरी-सिंधुदुर्गात सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ९ वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले आहे.

कुडाळ 7.48 टक्के

कणकवली 7.00 टक्के मतदान

सावंतवाडी 8.39 टक्के मतदान झाले.

Narayan Rane :  नारायण राणेंनी वरवडे गावी बजावला मतदानाचा हक्क

रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी आज मतदान असून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज त्यांच्या वरवडे या गावी मतदानाचा हक्क बजावला. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना केल्याचं राणे म्हणाले. मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो, असंही ते म्हणाले.

2024 India elections : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

रायगड

ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क

रेवदंडा येथील मतदान केंद्रावर केले मतदान

आप्पासाहेब यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीयांनी देखील केलं मतदान

भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील- धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपले ज्येष्ठ बंधू आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची गळाभेट घेऊन आज मतदानाच्या दिवशी आशीर्वाद घेतले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे कुटुंब मागील काही दिवसांपासून पक्षापासून काहीसे दूर होते. आज मतदानाच्या दिवशी अकलूज येथील विजय चौकात धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची आज गळाभेट घेऊन आर्शिवाद घेतले.

Latur Voting : भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सहकुटुंब केले मतदान

लातूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. नांदेड लोकसभेचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लातूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील चिखली या त्यांच्या मूळगावी मतदान केले. चिखलीकर यांच्यासोबत त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी देखील चिखली गावात मतदानाचा हक्क बजावला.

Baramati Voting : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी

बारामती : 7.75 टक्के

भोर : 5.75 टक्के

दौंड : 5.50 टक्के

खडकवासला : 6.00 टक्के

इंदापूर : 5.00 टक्के

पुरंदर : 4.94 टक्के

Sangli : सांगलीत अंकलखोपमधील मतदान यंत्रात बिघाड

सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रिया सुरळीत सुरू होती. परंतु, सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पलूस कडेगांव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा मंदिर जवळील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक २५० मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले. मतदान यंत्र बंद पडले. याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सकाळी साडेआठ पर्यंत हे मतदान यंत्र दुरूस्ती करून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू केली.

Palghar News : पालघरचे खासदार राजेंद्र गावित घरवापसी करणार

शिवसेनेचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करणार

आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

थोड्याच वेळात भाजपच्या मुंबई पक्षकार्यालयात होणार प्रवेश सोहळा

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील राहणार हजर

पालघरमधून यंदा शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने गावित नाराज असल्याची चर्चा

Baramati Lok Sabha : बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ५.७७ टक्के मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळपासून ५.७७ टक्के मतदान

बारामती विधानसभा मतदारसंघात ७.७५ टक्के मतदान

पुंरदर विधानसभा मतदारसंघात ४.९४ टक्के मतदान

Satara Lok Sabha Votting Live: उदयनराजे भाेसले यांनी मतदानासाठी साधला ७ वाजेचा मुहुर्त, कारण आहे खास

सातारा लाेकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (मंगळवार, ता. ७ मे) शहरातील अनंत इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर ७ वाजून ७ मिनिटांनी मतदान केले. त्यांच्या समवेत आई कल्पनाराजे भाेसले, पत्नी दमयंतीराजे भाेसले हे उपस्थित हाेते.

उदयनराजेंचा आवडता क्रमांक ७ आहे. आज ७ मे तारीख आहे. त्यातच राजेंनी मतदानासाठी ७ वाजून ७ मिनिटांचा मुहुर्त साधत मतदान केल्याने त्याचीही चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळेत ७ टक्के मतदान

Breaking News: अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंना निवडणूक आयोगाची नोटीस; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करताना महायुतीच्या नेत्यांकडून मतदारांना प्रलोभनं दाखवली जात असल्याच्या तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.

त्यामुळे आचारसंहितेच्या भंगप्रकरणी निवडणूक आयोगाने दोन्ही नेत्यांना नोटीस बजावली आहे. भाषण करताना मतदारांना कोणतेही आश्वासन देऊ नका, असे आदेश निवडणूक आयोगाने नोटीसीत दिले आहेत.

Maharashtra Lok Sabha Votting Live: महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात आतापर्यंत किती मतदान? वाचा संपूर्ण आकडेवारी

महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.64% मतदानाची नोंद झाली आहे.

  • लातूर - 7.91% टक्के मतदानाची नोंद

  • सांगली - 5.81% टक्के मतदानाची नोंद

  • बारामती - 5.77% टक्के मतदानाची नोंद

  • हातकणंगले - 7.55% टक्के मतदानाची नोंद

  • कोल्हापूर - 8.04% टक्के मतदानाची नोंद

  • माढा - 4.99% टक्के मतदानाची नोंद

  • धाराशीव - 5.79% टक्के मतदानाची नोंद

  • रायगड - 6.84% टक्के मतदानाची नोंद

  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 8.17% टक्के मतदानाची नोंद

  • सातारा - 7.00% टक्के मतदानाची नोंद

  • सोलापूर - 5.92% टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha Votting Live: श्रीनिवास पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

सातारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. कराड शहरातील पालिका शाळा नंबर 3 मध्ये श्रीनिवास पाटील यांनी मतदान केले. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदान करावे. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा माणूस दिल्लीला पाठवावा, असे आवाहन त्यांनी केलं.

Raigad Lok Sabha Votting Live: बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

Summary

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर कायम आहेत. आज प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी वरसई येथील मंदिरात बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो असफल ठरला. 13 वर्षांपूर्वी सुरू झालेले हे धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झालंय.

परंतु प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी आहे. प्रकल्पग्रस्त 6 गावांमध्ये जवळपास 8 हजार मतदार आहेत. संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाला याबत इशारा दिला होता परंतु मागण्या पूर्ण न झाल्याने ते आपल्या भूमिकेवर कायम आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे.

Baramati Lok Sabha Votting Live: शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या.

Solapur Lok Sabha Votting Live: भाजप आमदार सुभाष देशमुख यांची काँग्रेसवर सडकून टीका

- दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख मतदानाचा हक्क बजावला

- जवळपास अर्धा तास रांगेत थांबून आमदार सुभाष देशमुख यांनी मतदान केले.

- सुभाष देशमुख यांच्यासोबत पत्नी स्मिता आणि मुलगा मनीष देशमुख यांनीही मतदान केले.

- सर्वसामान्य मतदारांप्रमाणे मी देखील रांगेत थांबून मतदान केले.

- सोलापूर जिल्ह्यात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.

- काँग्रेसच्या कार्यकाळात केवळ आश्वासनांची खैरात पाहायला मिळाली

- मात्र दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी विकास कामांची गंगा संपूर्ण देशभरात आणली.

- या देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही.

- गीता, बायबल, कुरआन यापेक्षा सर्वोच्च असे संविधान आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

- त्यामुळे सोलापूर मध्ये भाजपचा विजय निश्चित आहे, असं सुभाष देशमुख म्हणाले.

Madha Lok Sabha Votting Live: माढ्यातील जनता मला या निवडणुकीमध्ये निवडून देईल : धैर्यशील मोहिते पाटील

माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने माझी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माढ्यातील जनता मला या निवडणुकीमध्ये निवडून देईल असा माझा पूर्ण विश्वास आहे, असे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानापूर्वी सांगितले. धैर्यशील मोहिते पाटील हे अकलूज येथील शंकर नगर येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाले आहेत. मतदान करण्यापूर्वी त्यांनी साम टीव्हीला ही प्रतिक्रिया दिली आहे.

Baramati Lok Sabha Votting Live: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

भाजपचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे आणि चिरंजीव निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.

Dharashiv Lok Sabha Votting Live: लातूरच्या औसा येथे EVM मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मिनिटांपासून मतदान थांबले

धाराशिव लोकसभा मतदारसंघात असलेल्या औसा येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जवळपास ४५ मिनिटापासून मतदान थांबलं आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून मशीन दुरुस्ती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Baramati Lok Sabha Voting LIVE: बारामतीत श्रीनिवास पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

बारामतीत श्रीनिवास पवार, रोहित पवार, अजित पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे.

Solapur Lok Sabha Voting LIVE: दक्षिण सोलापुरात 'व्हीव्हीपॅट' मशीनमध्ये तांत्रिक बिघाड, अर्ध्या तासापासून मतदान थांबले

सोलापूर ब्रेकिंग

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मागच्या १५ ते २० मिनिटांपासून मतदान थांबलं आहे. दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतर देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत असल्याची माहिती आहे. मशीन दुरुस्तीसाठी प्रशासकीय अधिकारी बुथकडे रवाना झाले आहेत. गरज पडल्यास मशीन बदलले जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Dharashiv Lok Sabha Voting LIVE: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

धाराशिव

महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

ओमराजे निंबाळकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

मतदानाला जाण्यापूर्वी ओमराजे निंबाळकर यांना पत्नीकडून औक्षण करण्यात आले

आई आणि आत्याचे आशीर्वाद देखील निंबाळकर यांनी घेतले

निंबाळकर यांनी मतदानापूर्वी वडिलांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले

निंबाळकर यांनी आपल्या गावी म्हणजेच गोवर्धनावडी येथे मतदानाचा हक्क बजावला

Gujarat Lok Sabha Voting LIVE: नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलं मतदान, भाजप कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

गुजरातमधील सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता.

Baramati Lok Sabha Voting LIVE: बारामतीचं राजकीय वातावरण तापलं, रोहित पवारांचा अजित पवार गटावर गंभीर आरोप

अजित पवार गटाने मध्यरात्री बारामतीतील मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र या आरोपांचं खंडण केलं आहे.

Baramati Lok Sabha Voting LIVE: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केलं मोठं आवाहन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील काटेवाडी येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ही निवडणूक भावकीची नसून विकासाची आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Ratnagiri Lok Sabha Election 2024 Voting LIVE: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदानाला सुरुवात झालीय

भाजपचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे.

दोन तगड्या उमेदवारांमध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता अनेकांना आहे.

जिल्ह्यातील 14 लाख 51 हजार 630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.

एकूण 120 पोलीस अधिकारी, 2680 पोलीस कर्मचारी, 1692 होमगार्ड यांची बंदोबस्तात आहे.

Madha Lok Sabha Election 2024 Voting LIVE: माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. माढ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. याशिवाय इतर 32 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघांमध्ये एकूण 19 लाख 86 हजार इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार, याकडेच संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE: राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात थोड्यात वेळात मतदानाला सुरुवात

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यादत महाराष्ट्रात ११ जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या मतदारसंघांचा समावेश आहे.

बारामती, कोल्हापूर, सांगलीकडे सर्वांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, मागील काही दिवसांपासून हे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार, कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक, अशी थेट लढत होणार आहे. थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com