शिंदे सरकारची मोठी घोषणा; आता 'या' वयातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास

शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली.
Senior Citizens ST Bus Travel Free
Senior Citizens ST Bus Travel FreeSAAM TV

Senior Citizens ST Bus Travel Free : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे सरकारने (Eknath Shinde) सर्वसामान्यांसाठी तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Eknath Shinde Todays News)

Senior Citizens ST Bus Travel Free
शिंदे सरकारचं राज्याच्या जनतेसाठी गिफ्ट; CM एकनाथ शिंदे यांनी केल्या ३ महत्वाच्या घोषणा

शिंदे सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून मोफत प्रवास करता येईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त शिंदे सरकारने गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

गोविदांना मिळणार १० लाखांचा विमा

गोविंदा पथकांना शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. नुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. (75 Years Old Senior Citizens ST Bus Travel Free)

Senior Citizens ST Bus Travel Free
Vinayak Mete accident case: मेटेंचे चालक समाधान वाघमारेंचा मोठा खुलासा; म्हणाले,' 3 ऑगस्ट रोजी आम्ही...'

कर्मचाऱ्यांच्या खात्यात DA अरियरचे पैसे जमा

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. गणपती उत्सवापूर्वी खात्यात पैसे जमा झाल्यानं कर्मचारी आनंदात आहेत. सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ४ टक्के वाढ केलीय. महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या खात्यात दोन हप्ते जमा केले आहेत. आता सरकार तिसरा हप्ता खात्यावर पाठवत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com