Eknath shinde
Eknath shinde saam tv

शिंदे सरकारचं राज्याच्या जनतेसाठी गिफ्ट; CM एकनाथ शिंदे यांनी केल्या ३ महत्वाच्या घोषणा

शिंदे सरकारने सरकारी कर्मचारी, ७५ वर्ष पूर्ण केले जेष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

Eknath Shinde News : शिंदे सरकारची आज, मंगळवारी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शिंदे सरकारने राज्य सरकारने महत्वाचे निर्णय घेत जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे सरकारने सरकारी कर्मचारी, ७५ वर्ष पूर्ण केले जेष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या निर्णयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

Eknath shinde
शिंदे सरकारकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

शिंदे सरकार सत्तेवर विराजमान येताच दुसऱ्यांदा नव्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात ३ टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही वाढ ऑगस्ट २०२२ पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता ३१ वरून ३४ टक्के होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून 75 वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यात पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

Eknath shinde
Maharashtra Politics : एकनाथ जागेवरच आहे; पवारांच्या प्रश्नाला शिंदेचं उत्तर

तसेच शिंदे सरकारने दहीहंडी पथकातील गोविंदाबाबत देखील मोठा निर्णय घेतला आहे. गोविंदा पथकांची शासनाने विमा कवच द्यावा अशी मागणी होती, या मागणीनुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. नुसार गोविंदा पथकातील गोविंदांना आता 10 लाखाचे विमा संरक्षण शासनाकडून देण्यात येणार आहे. या विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com