Ajit Pawar Eknath Shinde
Ajit Pawar Eknath ShindeSaam TV

Maharashtra Politics : एकनाथ जागेवरच आहे; पवारांच्या प्रश्नाला शिंदेंचं उत्तर

'एकनाथ कुठे नाही गेला, एकनाथ जागेवरच आहे' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Published on

CM Eknath Shinde : ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे...?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे'. असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या प्रश्नाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. 'एकनाथ कुठे नाही गेला, एकनाथ जागेवरच आहे' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेनंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसह मुंबईत पत्रकारपरिषद घेतली यावेळी ते बोलत होते. (CM Eknath Shinde vs Ajit Pawar News)

अजित पवार काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत ८ ऑगस्टला नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला होता. बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Eknath Shinde) उपस्थित होते. बैठकीदरम्यानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत.

मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत उभे असल्याचे दिसले. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. त्यावरून, अजित पवारांनी सरकारचे कान टोचले. तो फोटो महाराष्ट्राच्या सन्मानाला धक्का आहे. फोटो पाहिल्यानंतर ‘धर्मवीर’ चित्रपटातील स्वर्गीय आनंद दिघे यांनी विचारलेला ‘एकनाथ कुठे आहे...?’ हा प्रश्न महाराष्ट्राला, मराठी माणसाला पडला आहे'. असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

'ठाकरेंनी राजीनाम्यानंतरही आदेश जारी केले'

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय घेतले होते. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळानं घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली आहे. यावरून शिंदे सरकारकर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतरही घाई-गडबडीत अनेक निर्णय घेतले. असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com