MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण

Mumbai Indians Playoffs Scenario: मुंबईने हैदराबादविरुद्ध शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का? जाणून घ्या समीकरण
MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण
mumbai indians can still qualify for the playoffs know the scenario amd2000twitter
Published On

आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडायच्या वाटेवर असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला चांगलंच आस्मान दाखवलं आहे. स्पर्धेतील ५५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार कामगिरी करत ७ गडी राखून विजय मिळवलाा. सूर्यकुमार यादव या विजयाचा हिरो ठरला आहे. त्याने शतक झळकावत हैदराबादच्या तोंडचा घास हिसकावला. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय ठरला आहे. इथून पुढे मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का? जाणून घ्या. (MI Playoffs Scenario)

या सामन्यातील पहिल्या डावात सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा केल्या. हैदराबादकडून सलामीवीर फलंदाज ट्रेविस हेडने ३० चेंडूंचा सामना करत ४८ धावांची खेळी केली. तर शेवटी पॅट कमिन्सने १७ चेंडूंचा सामना करत ३५ धावांची खेळी केली. दरम्यान धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्यने १७.२ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण
IPL Playoffs Scenario: मुंबईच्या विजयाने हैदराबादचं टेन्शन वाढलं! तर या संघांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा

मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाऊ शकतो का?

मुंबईने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला तरी मु्ंबईचं प्लेऑफमध्ये जाणं कठीण आहे. मुंबईने आतापर्यंत १२ सामने खेळले असून ८ सामने गमावले आहेत आणि ४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे. इथून पुढे मुंबईचे २ सामने शिल्लक आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरीदेखील मुंबईचा संघ जास्तीत जास्त १२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. सध्या राजस्थानचा आणि कोलकाताचा संघ १६ गुणांसह पहिल्या दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे मुंबईचं यंदा तरी प्लेऑफ गाठणं कठीण आहे.

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण
IPL Points Table Update: KKR नंबर १, CSK ची टॉप ४ मध्ये एन्ट्री! LSG चं टेन्शन वाढलं; पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल

चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी १२ गुणांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईला जर प्लेऑफमध्ये जायचं असेल, तर पुढील दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यासह त्यांना प्रार्थना करावी लागणार आहे की, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबादने पुढील सामने गमावले पाहिजे आणि तिन्ही संघ १२ गुणांवर थांबले पाहिजे. असं झाल्यास मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो. मात्र हे समीकरण मुळीच सोपं नसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com