Nandurbar News : मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले; अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

मासेमारीसाठी नाल्यात उतरलेले दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले.
Nandurbar News
Nandurbar News Saam TV

नंदूरबार : राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून रस्ते जलमय झालेत. अशातच नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मासेमारीसाठी नाल्यात उतरलेले दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेले. अचानक पूर आल्याने ही घटना घडली. परिसरातील ग्रामस्थांनी या दोन तरुणांचा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत . (Nandurbar Todays News)

Nandurbar News
Nashik News : एकाला वाचवायला गेला अन् दुसराही बुडाला; नाशिकमध्ये हृदय हेलावणारी घटना

गुरुदिप दिलीप पाडवी( वय 28) वर गणेश मोतु पाडवी (वय 40) (दोन्ही रा . जांभीपाडा) अशी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जांभीपाडा येथील गणेश आणि दिलीप पाडवी हे दोघेभाऊ मासेमारी करण्यासाठी नाल्यात उतरले होते. मासे पकडत असतांना नाल्यात पाण्याच्या अचानक प्रवाह वाढल्याने ते दोघे पाण्याच्या प्रवाह सोबत वाहु लागले. त्यावेळी खबर देणाऱ्या व्यक्तीने त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. (Nandurbar Latest Marathi News)

Nandurbar News
थरारक! पुराच्या पाण्यात पिकअप गेली वाहून; चालकासह २ जण बुडाल्याचा अंदाज

मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तोही वाहू लागला. इतर लोकांनी काठीच्या साह्याने बाहेर काढून खबर देणाऱ्याला वाचवले. मात्र गुरुदिप पाडवी व गणेश पाडवी हे सदर पाण्यात वाहून गेले त्यांचा खबर देणार व इतर लोकांनी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत .

याबाबत आकाश दिलीप पाडवी यांच्या खबरीवरून उपनगर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली आहे. मिसिंग व्यक्ती मिळून आल्यास उपनगर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास असई केशव मिठ्या गावीत करीत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com