Baramati Lok Sabha: मतदानादरम्यान सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, कुटुंबीयांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या?

Supriya Sule Visit Ajit Pawar Home: आज बारामतीमध्ये मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी गेल्या आहेत. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईला म्हणजेच त्यांच्या काकीला भेटायला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Supriya Sule
Supriya SuleYandex

आज बारामतीमध्ये मतदान (Baramati Lok Sabha) पार पडत आहे. मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या घरी गेल्या आहेत. सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आईला म्हणजेच त्यांच्या काकीला भेटायला गेल्याचं त्यांनी सांगितलं आहे. खासदार सुप्रिया सुळे या अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या आहेत. अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी दाखल झाल्या असल्याची माहिती मिळत आहे.

आज बारामतीमध्ये मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Supriya Sule Visit Ajit Pawar Home) एकच खळबळ उडाली होती. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी माझ्या काकींच्या घरी आले आहे.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझं मतं आहे की याला फक्त मी इमोशनल भावनिक स्ट्रटजी असतात. पण मी टिप्पणी करणार नाही. शत्रू तर नाही, भाऊ बहीण असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. त्या (Supriya Sule) म्हणाल्या की, अजित पवार यांनी खूप चांगलं उत्तर दिलं आहे. आई पाठीशी असणं खुप महत्वाचं असतं. आईच्या आशीर्वादापेक्षा मोठं काय असतं. यावेळी त्या काकींचा आशिर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या घरी आल्या असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये मतदानाच्या दिवशीच सुप्रिया सुळे थेट दादांच्या भेटीला गेल्याने मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

आज बारामतीत मतदानाची रणधुमाळी (Maharashtra Lok Sabha Election 2024) पाहायला मिळतेय. महायुतीकडून अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यात थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या आईची भेट घेतली आहे. बारामतीत नणंंद भावजयीमध्ये थेट लढत होत आहे.

Supriya Sule
Baramati Lok Sabha: बारामतीत पैशांचा पाऊस, पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटले; VIDEO शेअर करत रोहित पवारांचा गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com