Pune: राज्यात शिंदे फडणवीस आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार पहिल्यांंदाच एका मंचावर आले. निमित्त होत, संतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा. वसंत दादा शुगर ईन्स्टिट्यूटची पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) अनेक किस्से सांगताना शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवार यांचे तोंडभरुन कौतुक केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, "ऊस शेती, साखर उद्योगासाठी समर्पित असणारी देशातील एकमेव संस्था असणारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते शरद पवार आहेत. मी देखील दावोसला जाऊन आलो आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक आली आहे"
पुढे बोलताना "कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रात शरद पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो, मला ज्यावेळी सल्ल्याची गरज असते. त्यावेळी मी शरद पवारांना फोन करतो. ते नेहमी चांगले सल्ले देतात," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील मांजरी येथे ही सर्वसाधारण सभा पार पडली. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवारही उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.