PM Modi Rally In Mumbai : मोदींच्या सभेत झाला होता घुसखोरीचा प्रयत्न, आतापर्यंत २ जणांना घेतलं ताब्यात

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली
PM Modi Rally In Mumbai
PM Modi Rally In MumbaiANI
Published On

Mumbai Crime News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर मुंबईतील सभेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) नावाचे बनावट ओळखपत्र वापरून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे. (Latest Marathi News)

PM Modi Rally In Mumbai
Mumbai Crime News : गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार; धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मुंबईच्या (Mumbai) बीकेसीमधील जाहीर सभेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) नावाचे बनावट ओळखपत्र वापरून रामेश्वर मिश्रा याने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.

रामेश्वर मिश्रा हा नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो भारतीय सैन्याच्या गार्ड रेजिमेंटचा शिपाई असल्याचा दावा करत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पोलिसांनी रामेश्वर मिश्राला अटक केली आहे. बीकेसी पोलीस आता त्याच्या पोलीस स्टेशनची पडताळणी करत आहेत.

एमएमआरडीए मैदानावरील प्रवेश द्वारावर व्यवस्थापन करणाऱ्या पोलिस कर्मचार्‍यांच्या पथकाने मिश्रा यांना अडवले आणि पुढे ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तथापि, लष्कर, आयबी, दिल्ली पोलिस आणि पंतप्रधान सुरक्षा अधिकारी यांसारख्या विविध एजन्सी त्याची माहिती घेत आहेत की तो व्हीव्हीआयपी विभागात का जाण्याचा प्रयत्न करत होता.

PM Modi Rally In Mumbai
Ajit Pawar : 'मी बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो अन् पार्सल...'; अजित पवार यांचा गोपीचंद पडळकरांना टोला

नरेंद्र मोदींच्या सभा परिसरातून एकाला शस्त्रासह ताब्यात

Mumbai Crime News : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसापूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांची बीकेसी येथील MMRDA मैदानात सभा होती. नेमकं याच परिसरातून एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी घातक शस्त्रासह ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांच्या तपासात कातराम चंद्रगाय कवाड असे या आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे. ३९ वर्षीय कातराम हा हॉटेल व ट्रान्सपोर्टचं काम करत असून तो भिवंडी ग्रामीणचा राहणारा असल्याचे तपासात समोर आले आहे.

गस्तीवरील पोलिसांना सभा परिसरात त्यांच्यावर संशय आला. त्याच्या अंग झडतीत त्याच्याजवळ स्मिथ अॅन्ड व्हेजन स्प्रिगफिल्डची रिव्हाल्वर व त्यात चार राऊंड मिळून आले. या रिव्हालव्हरचा त्याच्याजवळ परवाना असल्याचे कळते.

मात्र, मुंबई पोलीस आयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी त्याच्यावर बीकेसी पोलिस ठाण्यात कलम 37(1), 135 मपोका 1951 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीकेसी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com