Mumbai Crime News : गतिमंद मुलीवर ३ अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार; धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

नराधमांनी घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे.
Crime News
Crime Newssaam tv

सुरज सावंत

Mumbai Crime News : मुंबईमध्ये अतिशय चिड आणणारी घटना घडली आहे. एका गतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर या नराधमांनी घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही शौचालयासाठी गेली असताना तीन विधीसंघर्ष मुलांनी तिला जबरदस्ती शौचालयात नेले. यातील एका मुलाने तिच्यासोबत जबरदस्ती अत्याचार केला, तर इतर आरोपींनी त्याचे मोबाईल चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर वायरल केले. वायरल झालेला व्हिडिओ मुलीच्य भावाने सोशल मीडियावर पाहिल्यानंतर घरातल्यांना बहिणीसोबत झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

Crime News
Mumbai News: रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप, मोबाईल करायचा लंपास; ४ लॅपटॉप, ३ मोबाईलसह आरोपी ताब्‍यात

सदर घटनेत पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तीन विधीसंघर्ष मुलांविरोधात 376, 376 (जे) (एल), 323, 500, 34 सह कलम 4 पोक्सो सह कलम 66(ई) 67(बी) आय टी अॅक्ट अंतर्गग गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिनही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने तिघांची रवानगी डोंगरीच्या बाल सुधारगृहात केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात मुलींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com