Ajit Pawar : 'मी बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो अन् पार्सल...'; अजित पवार यांचा गोपीचंद पडळकरांना टोला

अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.
AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
AJit Pawar And gopichand padalkar PadalkarSaam Tv
Published On

Ajit Pawar News : अजित पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या मिश्किल भाषणासाठी ओळखले जातात. अजित पवार यांनी कालही मिश्किल भाषण करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली.

'मी बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो आणि पार्सल आणलेल्यांना परत पाठवतो, असा टोला अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता लगावला. (Latest Marathi News)

AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
Pankaja Munde : 'चंद्रशेखर बावनकुळेंना त्रास द्यायचा ठरवलं, तर...'; पंकजा मुंडे असे का म्हणाल्या?

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मनेराजुरी येथे सरपंचांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.

अजित पवार म्हणाले, तासगावकरांनो आर. आर. पाटील (R.R.Patil) यांना कधी तुम्ही चांगल्या मतांनी निवडून दिला आहे का? का रे बाबांनो मात्र हाच आबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या वक्तृत्वाने आकर्षित केलं होतं. पण कधी तुम्ही आबांना भरपूर मताधिक्याने निवडून दिलं नाही'.'मी तर बारामतीमधून लाखोंच्या मताने निवडून येतो.आणि पार्सल आणलेल्यांना परत पाठवतो. अशी टीका ही गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) याचे नाव न घेता केली.

AJit Pawar And gopichand padalkar  Padalkar
Aaditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या ८० हजार कोटींच्या एफडीवर भाजपचा डोळा; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

'आज काही लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांना आत टाकले. संजय राऊत यांना आतमध्ये टाकले. नंतर म्हणाले यांच्या बद्दल पुरावेच नाहीत, असे अजित पवार म्हणाले.

तर 'धर्मवीर'वरून झालेल्या वादावरही अजित पवार यांनी भाष्य केलं. 'मी चुकून नाव चुकले की लगेच माफी मागा. पण छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षकच. कुणी काही म्हटलं तरी मी माफी मागणार नाही. स्वराज्य रक्षक म्हणजे राज्याचे रक्षक आणि धर्माचे पण रक्षक, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com