Manasvi Choudhary
काखेतील काळेपणा ही मोठी समस्या आहे. महिलांना काखेतील काळवटपणामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.स्लीव्हलेस कपडे परिधान करता येत नाही.
काखेतील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करू शकता.
कोरफडमध्ये 'अलोसिन' असते, जे त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते कोरफडीचे जेल काखेत लावा, १५ मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.
काकडीत नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात आणि ती त्वचेला थंडावा देते. काकडीच्या चकत्या काखेत चोळा किंवा रस काढून कापसाने लावा.
बटाटा नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे. बटाट्याचा काप काखेत ५-१० मिनिटे चोळा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
कोरडेपणामुळेही काखेतली त्वचा काळी पडते. खोबरेल तेल त्वचेला मॉइश्चरायझ करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने काखेत ५ मिनिटे मसाज करा.
काखेचा काळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर आहे. बेकिंग सोड्यामध्ये थोडे पाणी मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट काखेत लावून सुकू द्या आणि नंतर धुवा.
रेझरमुळे त्वचेवर घर्षण होते आणि त्वचा जाड व काळी पडते. यामुळे सतत शेव्हिंग करू नका.
अतिशय घट्ट कपडे घातल्यामुळे त्वचेचे सतत घर्षण होते. यामुळे घट्ट कपडे घालणे टाळा