Mihos Electric Scooter : डाउनपेंमेटशिवाय बुक करा इलेक्ट्रिक स्कुटर, दमदार रेंज व फीचर्ससोबत होणार लॉन्च !

ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या खिशाला परवडेल अशी आहे याची किंमत 1.50 लाखापासून सुरु आहे.
Mihos Electric Scooter
Mihos Electric Scooter Saam Tv

Mihos Electric Scooter : देशात इलेक्ट्रिक स्कूटर, बाईक आणि कारची संख्या सातत्याने वाढत आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, वॉर्ड विझार्डने जॉय ई-बाईक या ब्रँडची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली. आता कंपनीने या स्कूटरवर नवीन स्कीम जाहीर केली आहे.

या स्कूटरची स्कीम व फिचर्स उपलब्ध आहेत आणि त्याची किंमत काय आहे हे जाणून घेऊया

1. कंपनीने केली ही घोषणा

वॉर्ड विझार्डच्या ब्रँड जॉय ई-बाईकने मिहोस इलेक्ट्रिक स्कूटरवर नवीन योजना जाहीर केली आहे. कोणतेही पैसे न भरता स्कूटर बुक करता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. 22 जानेवारी 2023 पासून कंपनी यासाठी बुकिंग सुरू करेल.

2. बुकिंगची पद्धत

जर तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ती ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही बुक करू शकता. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह, देशभरातील 600 हून अधिक डीलरशिपद्वारे देखील ते बुक केले जाऊ शकते. त्याच्या बुकिंगसाठी (Booking) कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

3. किंमत

कंपनीने ही इलेक्ट्रिक स्कूटर ऑटो एक्सपो 2023 मध्येच लॉन्च केली होती. लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी 22 जानेवारीपासून त्याचे बुकिंग सुरू होणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत कंपनीने 1.49 लाख रुपये (Price) ठेवली आहे. मात्र, ही किंमत पहिल्या पाच हजार ग्राहकांनाच मिळणार आहे. यानंतर कंपनी स्कूटरच्या एक्स-शोरूम किंमतीत बदल करू शकते.

Mihos Electric Scooter
Mihos Electric Scooter Social media

4. मजबूती

कंपनीच्या (Company) मते, स्कूटरची बॉडी खूप मजबूत आहे. हे पॉली डायसायक्लो पेंटाडीनपासून बनवले जाते. त्यामुळे ही स्कूटर खूप मजबूत होते. ऑटो एक्स्पो दरम्यान या स्कूटरच्या शरीराची ताकद दाखवण्यासाठी कंपनीकडून हॅमर टेस्टही करण्यात आली होती.

5. फीचर्स

या रेट्रो डिझाईन केलेल्या स्कूटरमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी, रिमोट अॅप, रिव्हर्स मोड, जीपीएस, अँटी थेफ्ट, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, साइड स्टँड सेन्सर, हायड्रॉलिक कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Mihos Electric Scooter
Mihos Electric Scooter Social Media

6. बॅटरी आणि रेंज

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये 74 V 40 AH बॅटरी बसवण्यात आली आहे. यामध्ये 1500-वॅटची मोटर बसवण्यात आली आहे, जी स्कूटरला 95 न्यूटन मीटरचा टॉर्क देते. स्कूटरला शून्य ते 40 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त सात सेकंद लागतात. त्याचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. बॅटरी चार्ज होण्यासाठी चार तास लागतात त्यानंतर ती 100 किमीची रेंज देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com