Cm Eknath Shinde News Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : CM एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरुन राज्यपालांना मविआची १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

Mahavikash Aghadi 12 MLA case : राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : महाविकस आघाडी काळातील विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती प्रकरणात महत्वाची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी परत पाठवली होती. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

10 ऑगस्ट 2022 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाला अनुसरून शिंदे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी 23ऑगस्ट 2022 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्त्यांसाठी नव्या शिफारसी करण्याकरिता आधीच्या महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांची यादी परत पाठवण्याची त्यांनी राज्यपालांना विनंती केली होती. (Maharasthra News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवताच राज्यपाल कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिफारस करण्यात आलेल्या नावांची यादी 30 ऑगस्ट 2022 रोजी परत पाठवली. नियुक्त्या होण्यापूर्वी अर्थात राज्यपालांकडून नावांचा स्वीकार केला जाण्यापूर्वी मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळ शिफारसी मागे घेऊ शकतात, असा दावा राज्य सरकारने केला आहे. (Latest Marathi News)

उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, याचिकाकर्ते आणि ठाकरे गटाचे कोल्हापूर शहरप्रमुख सुनील मोदी यांना सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर रिजॉईंडर सादर करण्यास वेळ दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे. मात्र पहिली यादी दोन वर्ष का स्वीकारली गेली नाही? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT